अनिल परब प्रकरणी वळसे पाटील यांचे महत्वाचे वक्तव्य

आता पुढचा नंबर परीवहन मंत्री अनिल परब यांचा लागला आहे.
 Dilip Walse Patil .jpg
Dilip Walse Patil .jpg

मंचर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली आहे, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहे. आता पुढचा नंबर परीवहन मंत्री अनिल परब यांचा लागला आहे, असा खळबळजनक दावा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) सोलापुरात केला होता. त्या विषयी विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की ''अनिल परब प्रकरणी आरोप करणे हे नवीन सुरू झाले, असून ह्या तपास प्रकरणी जास्त बोलणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (Home Minister Dilip Walse Patil criticizes BJP)

वळसे पाटील मंचर येथे वृक्षारोपण कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला ७ वर्ष पूर्ण झाले त्यावर बोलतांना त्यांनी भाजपला लक्ष केले. केंद्र सरकारला सात वर्षपुर्ण होत असताना आजपर्यंतच्या केंद्र व राज्यातील कामकाजात केंद्र सरकारचे अपयश आहे, त्यामध्ये केंद्र सरकारने अधिक सुधारणा करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या तिसरा लाटेचा सामना करण्यासाठी देश, राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीची यंत्रणा सज्ज आहे, टास्कफोर्सच्या तज्ञांचा सल्ला घेऊन काम सुरू आहे. म्युकरमायकोसिस सदर्भात तपासणी आणि लवकर उपचार करण्यासाठी वेगळा टास्क फोर्स शासनाला मार्गदर्शन करत आहे, असे त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते किरिट सोमय्या? 

माजी खासदार किरीट सोमय्या हे काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या कोविड करप्शनला भारतीय जनता पक्ष विरोध करत आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकावे. मात्र, जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी करणार आहे, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले. 

दरम्यान, शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक हे फरारी आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झाले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे लाईनीत आहेत. त्यामुळे ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असे म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही डिवचले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com