"तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो" मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन.. - You be careful we take responsibility Chief Minister appeal to the people | Politics Marathi News - Sarkarnama

"तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो" मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

"माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत प्रत्येकानं सामील व्हावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आता 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत प्रत्येकानं सामील व्हावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

कोरोनाची दुसरी लाट आली की काय असं चित्र सध्या आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्याची वाताहात झाली असं नाही, राज्यावर अनेक संकट आली, त्यावर सरकारने यशस्वी मात केली आहे. कोरोनाची लस डिसेंबर-जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. कोरोनाशी लढा देत असताना या मोहीमेत सर्व लोकप्रतिनिधीनी आपल्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, नागरिकांच्या आरोग्याची चैाकशी करून त्यांना योग्य उपाययोजना देण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.
 

प्रशासनही आरोग्यतपासणी करून नागरिकांची काळजी घेणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी कशी होईल याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे, नागरिकांनी आपली जबाबदारी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनेचं पालन केलं पाहिजे, "तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो," असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्री घरात बसून काम करतात, अशी माझ्यावर टिका केली जाते पण मी घरात बसून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतो. घराबाहेर पडण्यापेक्षा मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधत आहे. कोरोना मुकाबला करणं हे युद्ध आहे. आता सगळ्यानी काळजी घेत घराबाहेर न पडता कोरोनाशी कसा मुकाबला करता येईल, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

काही दिवसापासून हॅाटेल, जीम सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे, सूचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या लक्षात आणून द्यावे, घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष पुरवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. शेतकऱ्यांनी हमीभाव देण्यापेक्षा हमखास भाव कसा मिळेल, यासाठी शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  
 
कोरोना काळात आंदोलने नको; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,''
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख