हवाई दल प्रमुख म्हणाले, दीड वर्ष लागतील! गडकरींनी 15 दिवसांचं चॅलेंज स्वीकारलं

थेट धावपट्टी उभारण्याच्या कामातही विक्रम करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
Will Build Highway Airstrips In 15 Days says Nitin Gadkari To IAF Chief
Will Build Highway Airstrips In 15 Days says Nitin Gadkari To IAF Chief

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालायमार्फत देशात अनेक महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. असे काही विक्रमही त्यांच्या विभागाच्या नावावर आहेत. आता थेट महामार्गावर धावपट्टी उभारण्याच्या कामातही विक्रम करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. याबाबत गुरूवारी त्यांनी स्वत:च माहिती दिली. (Will Build Highway Airstrips In 15 Days says Nitin Gadkari To IAF Chief)

राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925ए वर हवाई दलासाठी आपत्कालीन धावपट्टी उभारण्यात आली आहे. या धावपट्टीचे लोकार्पण गडकरी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत गुरूवारी झाले. यावेळी बोलताना गडकरी यांनी त्यांच्या विभागानं केलेल्या विविध विक्रमांची माहिती देताना हवाई दलाच्या प्रमुखांशी झालेली चर्चेबाबतही स्पष्ट केलं. 

ही धावपट्टी उभारण्यासाठी सुमारे 19 महिन्यांचा कालावधी लागला आहे. गडकरी म्हणाले, 'एक धावपट्टी तयार करण्यासाठी साधारणपणे एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो, असं हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया काल म्हणाले. मी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्यासाठी उच्च दर्जाची धावपट्टी दीड वर्षांऐवजी केवळ 15 दिवसांत बनवू.' 

गडकरी यांनी यावेळी तीन जागतिक विक्रम केल्याचं सांगितलं. एक दिवसांत 38 किलोमीटर रस्ता उभारला आहे. जगात हा वेग सर्वाधिक ठरला आहे. मुंबई-दिल्ली एक्सप्रेस महामार्गावर अडीच किलोमीटरच्या चार लेन केवळ चोवीस तासांत बांधण्यात आल्या. हा दुसरा विक्रम आहे. तर विजापूर ते सोलापूर मार्गावर 26 किलोमीटरचा एका लेनचा रस्ता एका दिवसात उभारण्यात आल्याचा विक्रमही केल्याची माहिती गडकरी यांनी दिली. 

राजस्थानमधील बाडमेर परिसरात 350 किलोमीटर अंतरापर्यंत एकही विमानतळ नाही. आम्ही हवाई दल व नागरी वाहतुकीसाठी विमानतळ करण्यास जमीन देऊ. त्यांना आमचं पूर्ण सहकार्य राहील. याबाबत हवाई दल प्राधिकरणाकडूनही मार्गदर्शन घेतले जाईल. कुंदन पुरा, सिंघनिया आणि बक्सर गावांमध्ये हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com