Video : आरोग्यमंत्र्यांनी महिला सहकाऱ्याचं घेतलं चुंबन अन् द्यावा लागला राजीनामा

स्थानिक वृत्तपत्रामध्ये या कृत्याची छायाचित्र प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने टीका सुरू झाली.
UK Health Minister Matt Hancock resigns after viral kissing video
UK Health Minister Matt Hancock resigns after viral kissing video

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. त्यामुळं तिथं कोरोना नियमांचं उल्लंघन केलेल्यांवर कडक कारवाई केली जात आहे. ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनीही कोरोना नियमांचं उल्लंघन केलं अन् त्यांना थेट आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी महिलेचं कार्यालयातचं चुंबन घेतल्यानं त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. (UK Health Minister Matt Hancock resigns after viral kissing video)

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॅाक यांचं हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. स्थानिक वृत्तपत्रामध्ये या कृत्याची छायाचित्र प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने टीका सुरू झाली. ब्रिटनमध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे किंवा शारीरिक अंतर न ठेवणं नियमबाह्य आहे. वृत्तपत्रामध्ये 42 वर्षीय हॅनकॅाक यांची छायाचित्र समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात नागरिकांनीच मोहिम हाती घेतली. त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागितल्यानंतर नागरिकांचे समाधान झाल्यानं त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे.

हॅनकॅाक यांनी त्यांच्या मैत्रिणीचीच नेमणूक एका वरिष्ठ पदावर केली आहे. या दोघांचे हे कृत्य कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. ता. 6 मे रोजीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यावेळी ब्रिटनमध्ये कडक लॅाकडाऊन होता. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं किंवा शारीरिक अंतर न पाळणं नियमबाह्य होतं. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी होत होती. 

चोहाबाजूने टीका झाल्यानंतर हॅनकॅाक यांनी पंतप्रधान बोरीस जॅान्सन यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. कोरोनाच्या महामारीत ज्यांनी खूप काही गमावलं आहे, त्यांचे आपण देणं लागतो. मी नियमांचं उल्लंघन करून त्यांचा विश्वासघात केला आहे, असं हॅनकॅाक यांनी पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या कामाचे कौतुकही केले आहे. 

हॅनकॅाक यांच्या चुंबनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या लेबर पक्षाने जोरदार टीका केली. हॅनकॅाक यांनी राजीनामा द्यायलाच हवा पण पंतप्रधानांनीच त्यांची हकालपट्टी करायला हवी, असं या पक्षानं म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये सरकारी आकड्यांनुसार 1 लाख 28 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या कालावधी हॅनकॅाक यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. ते मागील तीन वर्षांपासून आरोग्यमंत्री म्हणून काम पाहत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com