IPS कृष्णप्रकाश यांना पार्टीत जेव्हा दारू पिण्याचा आग्रह होतो... 

मुक्तांगणच्या आवारात जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हाच त्यांच्यातल्या सकारात्मक ऊर्जेचा आम्हाला अनुभव आला.
  Krishnaprakash .jpg
Krishnaprakash .jpg

पुणे : जागतिक अमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त (26 जून) मुक्तांगणतर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये व्हर्च्युअल मॅरेथॉनचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णप्रकाश यांनी मुक्तांगणला दिलेल्या भेटीविषयी मुक्तांगणच्या  (Muktangan) मुक्ता पुणतांबेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. (Inauguration of Virtual Marathon organized by Muktangan at the hands of Krishnaprakash) 

पुणतांबेकर यांनी म्हटले आहे, कृष्णप्रकाश यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना यायला उशीर होत होता. पण कितीही उशीर झाला तरी ते नक्की येतील असे त्यांनी आश्वासन दिले होते. मुक्तांगणच्या आवारात जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हाच त्यांच्यातल्या सकारात्मक ऊर्जेचा आम्हाला अनुभव आला. रुग्णमित्रांशी अतिशय मोकळेपणाने गप्पा मारल्या. कविता, छोट्या कथा, अनुभव सांगितले.

व्यायामामुळे चांगले हार्मोन्स सिक्रीट होतात. म्हणून व्यसनमुक्त राहण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे ते सुद्धा त्यांनी सांगितले. ते स्वतः आयर्न मॅन आणि अल्ट्रा मॅन आहेत. मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांची ही थोड्या वेळाची भेट सुद्धा अतिशय उत्साह वाढवणारी होती, असे ही पुणतांबेकर यांनी सांगितले.  

यावेळी कृष्णप्रकाश यांनी संवाद साधला त्यावेळी त्यावेळी त्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले. ते म्हणाले की "मला पार्टीला बोलावल्यावर लोक दारू प्यायचा आग्रह करतात. 'मी पीत नाही', सांगितले तरीसुद्धा 'थोडे तरी प्या, सोशलायझेशनसाठी आवश्यक आहे', असे म्हणतात. मी त्यांना म्हणतो, 'तुम्ही माझ्या चांगल्या सवयीचे अनुकरण करत नाही, तर मी तुमच्या वाईट सवयीचे अनुकरण का करू?' आणि मी कधीच त्यांच्या आग्रहाला बळी पडत नाही." असेही त्यांनी सांगितले. यावर्षी मुक्तांगणचे सर्व कार्यक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com