करेक्ट कार्यक्रम? : `शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे फडणवीस यांना बंद खोलीत भेटले..

राणे यांच्या दाव्यानंतर राजकीय वादळ येण्याची शक्यता...
devendra-Uday samant
devendra-Uday samant

मालवण (सिंधुदुर्ग) : माजी खासदार निलेश राणे (Ex MP Nilesh Rane) हे आपल्या विरोधकांवर नेहमीच कठोर टीका करतात. उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना धारेवर धरत त्यांनी सामंत यांच्याबद्दल गौप्यस्फोटही केला आहे. देवेंद्र फडणवीस हे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलेले असताना उदय सामंत यांनी त्यांची गुप्त भेट घेतली, असा खळबळजनक दावा त्यांनी केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. (Minister Uday Samant meets Devendra Fadnavis in close door claims Ex MP Nilesh Rane)  

या भेटीचे त्यांनी थेट कारण सांगितले नसले तरी सिंधुदुर्ग वादळाच्या सावटाखाली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला वाऱ्यावर सोडले. भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात असा घणाघाती आरोप निलेश यांनी केला. फडणवीस आणि सामंत यांच्या या भेटीचा विषय आगामी काळात राजकीय वादळ उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांच्या या आरोपाला सामंत काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे. ही भेट फडणवीस यांच्या करेक्ट कार्य़क्रमाविषयी होती का, अशीही चर्चा होणे स्वाभाविक आहे. 

शिवसेनेच्या नेत्यांबद्दल राणे हे नेहमीच टीकात्मक बोलतात. वादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केेलेल्या दौऱ्यात त्यांनी आमदार वैभव नाईक यांनाही सोडले नाही. कोकणाने शिवसेनेला  भरभरून मते दिली. मात्र शिवसेनेने कोकणाला  काय दिले. आठ दिवस उलटले तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. वैभव नाईकांना प्रशासनात काडीची किंमत नाही, अधिकारी भीक घालत नाही. आठ, आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत त्यामुळे जी मदत शक्य आहे ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोचवण्याचे काम भाजप करत आहे, असे त्यांनी सांगितले.

वादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक याचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे अशी टीका निलेश राणे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com