...तर एका भरणेंसाठी सोलापुरचे तीन आमदार घरी बसले असते..

भरणे यांच्यासाठीतीन जागांवर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून उजनीच्या पाण्याचा विषय राष्ट्रवादीकडून तुर्तास बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-20T163911.362.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-20T163911.362.jpg

पुणे : सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापुरला वळविण्याचा निर्णय सोलापूरकरांच्या प्रचंड असंतोषामुळे राज्य सरकारला रद्द करावा लागला. निर्णय रद्द करण्याची भूमिका घेण्यामागे राष्ट्रवादीला कॉंग्रेसला वाटत असलेली निवडणुकीची भीती हे कारण असल्याची चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे.  Solapur Political Ujani water issue closed for three MLA


एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे NCP केवळ दोन आमदार व संजय शिंदे Sanjay Shinde यांच्या रूपाने एक सहयोगी आमदार आहे. त्यामुळे इंदापुरात  दतात्रेय भरणे यांच्यासाठी सोलापूरमधील तीन जागांवर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून उजनीच्या पाण्याचा विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तुर्तास बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. केवळ सर्वेक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्यात इतक्या तीव्रतेने उमटली तर प्रत्यक्ष निर्णय झाला असता तर काय झाले असते याचा अंदाज या निमित्ताने निर्णय घेणाऱ्यांना आला असेल. २०१४ पर्यंत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी क्रॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. आज ती परिस्थिती नाही. जिल्ह्यातील माढा व मोहोळ या दोनच मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. करमाळा मतदारसंघातून संजय शिंदे हे राष्ट्रवादी समर्थक आमदार आहेत. मात्र, निवडणूक लढविताना त्यांनी अपक्ष म्हणून लढविली आहे. याउलट माळशिरस, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट व पंढरपूर-मंगळवेढा या पाच मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आहेत. शिवाय बार्शीतून भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत निवडून आले आहेत. 

रणजितसिंह मोहिते-पाटील व प्रशांत परिचारक हे भाजपाचे दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. एकुणच आजमितीला भाजपाची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद व सोलापूर महापालिकादेखील भाजपाच्या ताब्यात आहे. सांगोला मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उजनीच्या पाण्याच्या प्रश्‍नावर भाजपाच्या आवाजात आवाज मिसळला आहे. सोलापूर मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहे. जिल्ह्यातल्या त्या कॉंग्रेसच्या एकमेव आमदार आहेत.

सध्या जिल्ह्यात भाजपा वरचढ असला तरी येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला संधी आहे. आगामी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्याचे चित्र बदलू शकते. मात्र, सोलापूरचे हक्काचे पाणी केवळ सत्तेच्या जोरावर इंदापूरला देण्यासारखे स्वत:च्या पायावर दगड मारून घेतल्यासारखे निर्णय घेतले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील सध्याचे तीन आमदार तर घरी बसतीलच यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शोधण्याची वेळ येईल. उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील सारी साखर कारखानदारी आणि पर्यायाने सारे अर्थकारण व राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द करण्याची घाई भाजपापेक्षाही राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना झाली होती. यावरूनच या विषयाचे गांभीर्य लक्षात येते.
Edited by : Mangesh Mahale    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com