ममतादीदींची मोदींवर आगपाखड.."बोलायचेच नाही, तर ते मुख्यमंत्र्यांना बोलावतातच का.."

बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांना कठपुतली बनवले होते.
30Sarkarnama_20Banner_20_202021_02_09T161517.068_0.jpg
30Sarkarnama_20Banner_20_202021_02_09T161517.068_0.jpg

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्वोत्तर १० राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर आरोप करीत आगपाखड केली. states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी एकतर्फी संवाद साधतात. ते आमच्याशी बोलत नाहीत. जर आमच्याशी बोलायचेच नाही, तर मुख्यमंत्र्यांना अशा बैठकांना ते बोलावतातच का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याला या बैठकीत बोलून न दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ममतांनी मोदींवर केला आहे. 

"बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांना कठपुतली बनवले होते. कुणालाही काहीही बोलू दिले नाही. फक्त भाजपशासित मुख्यमंत्र्यांना बैठकीत बोलू दिले. आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही. बैठकीत आमचा अपमान झाल्याची आमची भावना आहे," असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

आम्हाला निमंत्रित करुन मोदींना आम्हाशी संवाद साधला नाही, आम्हाला बोलू दिले नाही. मोदींनी आँक्सिजन किंवा रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत काहीही सांगितले नाही. ब्लॅक फंगरबाबत आम्हाला काहीही मोदींनी सांगितले नाही. बंगालमध्ये लस, आँक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी करायची होती. पण मोदींनी बोलू दिले नाही, असे ममतादीदी म्हणाल्या. मोदी इतके असुरक्षित आहेत की त्यांनी आमचे म्हणणे देखील ऐकले नाही, असे त्या म्हणाल्या.

देशातली कोविड आकडेवारी कमी झाल्याचा दावा ते करतात. पण अनेक राज्यांमध्ये कोविड वाढताना दिसतो आहे, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही ममतादीदींनी केला.  पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाचे प्रमाण सध्या कमी असले, तरी राज्यात कोविड नियंत्रणात असल्याचे मोदींनी सांगितले. मात्र, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींचा हा मुद्दा खोडून काढला. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com