3Sarkarnama_20Banner_20_202021_05_19T090818.888.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_05_19T090818.888.jpg

मोदी- शहांनी हिंदूंची पिछेहाट, दुर्दशा थांबवावी!

भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचला, अशी विनंती करण्यात आली आहे.

मुंबई : देशाच्या सुरक्षेविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज भाष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी  रक्षणासाठी कठोर पावलं उचलावीत अशी विनंती 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी हिंदूंची hindu community ही पिछेहाट व दुर्दशा थांबवावी, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

पाकिस्तान pakistan, बांगलादेशातील  bangaladeshहिंदू यातना भोगीत असतानाच बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करुनच भागणार नाही, तर शेजारी राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल असा एखादा दणका देणे गरजेचे आहे. मोदी-शहाजी आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचला, अशी विनंती आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मोदी यांच्या ‘शक्तिमान’ प्रतिमेमुळे तसेच गृहमंत्री शहा यांच्या ‘बाहुबली’ कार्यपद्धतीमुळे देशातील व देशाबाहेरील अतिरेकी प्रवृत्ती भारताला टरकून असल्याचेही सांगितले जाते, पण गेल्या काही दिवसांत शेजारी राष्ट्रांत तसेच जम्मू-कश्मीर खोऱ्यात हिंदू आणि शिखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडे फक्त हिंदू किंवा शीख म्हणून न पाहता आपल्या रक्ताची माणसे म्हणून पाहायला हवे. कश्मीरात अतिरेकी कारवायांनी पुन्हा फणा काढला आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनात आजी, माजी आमदार एकमेकांना भिडले 
 तिन्ही राष्ट्रांतले हिंदू तेथे परंपरेने, पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. ते आक्रमक नाहीत व अतिरेकी नाहीत. त्यांच्या मागण्याही नाहीत, पण शेजारच्या तिन्ही राष्ट्रांतील धर्मांध अतिरेकी त्यांना समूळ खतम करू पाहत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी हिंदूंची ही पिछेहाट व दुर्दशा थांबवावी. आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. म्हणूनच शेजार राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी विनंती अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करीत असतात. त्यात काहीच चुकीचे नाही. 
पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू समाज अल्पसंख्याक आहे व त्यांचे जगणे म्हणजे नरक यातनाच ठरत आहेत.
बांगलादेशाची स्थापना हिंदुस्थानमुळेच झाली, पण तेथे आज सगळयात जास्त खतरा हिंदू समाजास आहे.
बांगलादेशातही हिंदू मंदिरांवर व हिंदू समाजावर हल्ले सुरूच आहेत. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com