शेतकरी आंदोलनात आजी, माजी आमदार एकमेकांना भिडले 

तुम्ही दोघेही भुमीपूत्र असल्याने भांडू नका,असे सांगण्याची पाळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरच आली.
शेतकरी आंदोलनात आजी, माजी आमदार एकमेकांना भिडले 
220sunil_20shelke_bala_20bhegde_0.jpg

पिंपरीःमावळ (जि .पुणे) तालुक्यात मंगळवारी (ता. १०) झालेल्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके Sunil Shelkeआणि माजी आमदार भाजपचे बाळा भेगडे Bala Bhegade यांच्यातच चकमक उडाली. आपल्या भाषणातील मुद्यावर भेगडेंनी वैयक्तिक शेरेबाजी केल्याने शेळकेंनी वैयक्तिक टीका करू नका, असे सुनावले. त्यावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे तुम्ही दोघेही भुमीपूत्र असल्याने भांडू नका,असे सांगण्याची पाळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरच आली.

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण तसेच पुणे-नाशिक रेल्वेसाठी Pune-Nashik Railway एकीकडे पुणे जिल्ह्यातील शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नसून त्यासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यारही उपसलेले आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातच मावळ तालुक्यात, मात्र तळेगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक चारसाठी शेतकरी आपल्या जमीन देण्यास तयार आहेत. मात्र, एमआयडीसीने त्या घेण्यास गेली पाच वर्षे टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे त्याविरोधात शेतकऱ्यांनीच मंगळवारी (ता. १०) तळेगाव एमआयडीसीत आंबी येथे आंदोलन केले. त्यात  शेळके आणि भेगडे सामील झाले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला.  
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटीस; अजितदादांकडे अहवाल पाठविणार
२०१६ ला निगडे, आंबळे,  कर्हाट, पवळेवाडी येथील सहा हजार एकरवर एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत.  त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. उलट ते जमीनी द्यायला तयार आहेत. मात्र, एमआयडीसीनेच त्या ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात वाद वाढत चालले असून काही ठिकाणी कायदेशीर अडचणीही उभ्या राहिल्या आहेत.

त्यामुळे ३२/२ ची ही प्रक्रिया लवकरात लवकर उरकावी, यासाठी शेतकऱ्यांनाच आंदोलन करण्याची पाळी आली. बागायती वगळता अंदाजे सव्वाचार हजार एकर जमीन एमआयडीसी घेणार आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना चार हजार ३८० कोटी रुपये मिळणार आहेत. ३२/२ ची प्रक्रिया पूर्ण करून ते दीड वर्षापूर्वीच दिले असते, तर आतापर्यंत या रकमेवर चारशे कोटी रुपये जमा झाले असते, असे भेगडे म्हणाले. मात्र, ही प्रक्रिया खोळंबल्याने या जमिनीची खरेदी- विक्री सुरु झाली असून त्याचा फायदा एजंट तथा दलाल आणि फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, मी शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांनीच जमिनीचे पैसे घ्यायचे की जमिनीवरील शिक्के काढायचे हे ठरवायचे आहे, असे शेळके म्हणाले.
 
शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेळकेंनी आपण येथे जमिन घेतल्याचे सांगितले. तो मुद्दा पकडून  शेळके सर्वच जमिन विकत घेऊन पैसे शेतकऱ्यांना देऊ शकतात, असे भेगडे म्हणाले. त्याला शेळकेंनी आक्षेप घेत वैयक्तिक आरोप नको, असे बसूनच सुनावले. नंतर ते उभेही राहिले. यामुळे काहीसा गोंधळ उडाला. तुम्ही दोघे भांडू नका,असे सांगण्याची वेळ शेतकऱ्यांवरच आली.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in