हसन मुश्रीफांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे संतापले! - ShivendraRaje angry on Hasan Mushrif Reduction Ombale Memorial Fund | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

हसन मुश्रीफांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे संतापले!

ओंकार कदम
सोमवार, 12 जुलै 2021

स्मारकाचा निधी कमी केला तर मी या गोष्टीला विरोध करणार असल्याचा इशारा आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी दिला

सातारा : मुंबईत अतिरेक्याच्या हल्ल्यात शहिद झालेले तुकाराम ओंबळे  Tukaram Ombale यांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ  Hasan Mushrif  यांनी या स्मारकासाठी ५ कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यावरुन आमदार शिवेंद्रसिंह राजे ShivendraRaje संतापले आहेत.  

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केडंबे हे गाव म्हणजे दहशदवादी हल्ल्यात आपल्या प्राणाची पर्वा न करता कसाबच्या मुसक्या आवळत असताना ज्यांना वीर मरण आले त्या तुकाराम ओंबळे यांचे गाव. या गावामध्ये शहिद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक व्हावे, यासाठी या आधीच अजित पवार यांनी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे त्यामध्ये स्मारकाच्या बरोबरच गावाच्या विकासासाठी सुद्धा समावेश आहे. 

हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केल्याने सातारा-जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे संतापले असून त्यांनी स्मारकाचा निधी कमी केला तर मी स्वतः या गोष्टीला विरोध करणार असल्याचा इशाराच दिला आहे. या आधीच प्रशासनाने गावातील जागा हस्तांतरला विलंब केल्याने या स्मारकाच्या उभारणीला वेळ लागत आहे. प्रशासनाने आता लवकरात लवकर या प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा सूचना देखील आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या आहे.

खासदार उदयनराजेंची भाजपनं फसवणूक केली 
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान न देऊन भाजपने त्यांची एक प्रकारची फसवणुकच केली आहे. जी माणसं आज पर्यंत छत्रपतींच्या विचारांना विरोध करत आली त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं, असे आरोप करीत  आमदार शशिकांत शिंदे यांची भाजप वर टीका केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख