खासदार उदयनराजेंची भाजपनं फसवणूक केली.. - BJP cheated Udayan Raje Bhosale Shashikant Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

खासदार उदयनराजेंची भाजपनं फसवणूक केली..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

छत्रपतींच्या विचारांना विरोध करत आली त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं,

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान न देऊन भाजपने त्यांची एक प्रकारची फसवणुकच केली आहे. जी माणसं आज पर्यंत छत्रपतींच्या विचारांना विरोध करत आली त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं, असे आरोप करीत  आमदार शशिकांत शिंदे यांची भाजप वर टीका केली आहे.BJP cheated Udayan Raje Bhosale Shashikant Shinde

केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी नाराजी नाट्य सुरू आहे. या विस्तारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून खासदार उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता, परंतु तसे झाले नाही. याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप वर जोरदार टीका केली आहे. उदयनराजें हे राष्ट्रवादीचे खासदार होते त्यांच्यापदाचा कालावधी संपण्याआधीच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांना मंत्रीपदाबाबत आश्वासन दिले होते. परंतु आता झालेल्या विस्तारामध्ये उदयनराजेंना स्थान दिले नसल्याने भाजप ने एक प्रकारे उदयनराजेंची फसवणूकच केली असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे. 

ज्या पक्षाने आजपर्यंत छत्रपतींच्या विचाराना विरोध केला अशा पक्षाकडून अपेक्षा ठेवणं योग्य नव्हतं, असा टोला देखील या वेळी शशिकांत शिंदे यांनी लगावला. छत्रपती शिवरायांच्या काळा पासून नेहमी काही विचारांची लोकं महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती आणि ती आज ही करतायत असा आरोप देखील त्यांनी केला आहे. छत्रपतींच्या गादीवर अन्याय करण्याची नेहमी भूमिका कोण घेत हे आता पाहायला मिळालं आहे, असेही शिंदे म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख