‘शरद पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्याला जबाबदार कोण?’ शिवसेनेचा सवाल

राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत.
3Pawar_Soniya_Gandhi.jpg
3Pawar_Soniya_Gandhi.jpg

मुंबई : काँग्रेसच्या नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्या कामगिरीबाबत आजच्या 'सामना' मधून कैातुक करण्यात आले आहे. कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं आहे. "आज कॅाग्रेसमध्ये शरद पवार Sharad Pawar यांच्यासारखे नेते नाहीत, याला जबाबदार कोण," असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित केला आहे.   Shiv Sena MP Sanjay Raut reaction to the Congress leadership

"राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून भारताला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले त्यावर मंथन झाले,  " अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखात राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे. 

राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड घाणेरड्या शब्दांत टीका होत असतानाही ते त्यांच्या मुद्द्याला धरुन राहतात. कोरोना काळात राहुल गांधींनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन सरकारी पक्षाने टीकेची झोड उठवली. पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षानं अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्यांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण? प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मूळचे काँग्रेसी असलेले नेते इतरत्र जाऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, यास जबाबदार कोण? असा सवाल अग्रलेखात केला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात
कॅाग्रेसच्या नेत्या  सोनिया गांधी यांनी कॅाग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com