शिवसेना आमदाराचे अमानुष कृत्य; ठेकेदाराच्या अंगावर टाकली गटारातील घाण, व्हिडिओ व्हायरल

ठेकेदाराने त्याचे काम योग्यप्रकारे न केल्याने मला हे करावे लागले, असे आमदारांचे म्हणणे आहे.
Shiv Sena MLA Dilip Lande asks workers to dump garbage on contractor
Shiv Sena MLA Dilip Lande asks workers to dump garbage on contractor

मुंबई : मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुंबईतील (Mumbai) अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं. पावसाळ्याआधी नालेसफाईची कामं पूर्ण केल्याचा दावाही महापालिकेकडून करण्यात आला. पण दुसरीकडे नालेसफाईच्या कामावरून एका ठेकेदाराला शिवसेनेच्याच आमदाराकडून अमानुष वागणूक दिल्याचे समोर आले आहे. (Shiv Sena MLA Dilip Lande asks workers to dump garbage on contractor)

आमदार दिलीप लांडे यांनी केलेल्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. ते मुंबईच्या चांदिवली भागातील आमदार आहेत. मुंबई मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साठत आहे. चांदिवली भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदार लांडे कार्यकर्त्यांना घेऊन त्याठिकाणी गेले. तिथे ठेकेदारालाही बोलावून घेण्यात आले. 

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार लांडे कार्यकर्त्यांसोबत दिसत आहे. एका कार्यकर्त्यांकडून ठेकेदाराला पावसाच्या पाण्यात ढकलून दिले जाते. त्यानंतर गटाशेजारी साचलेली घाण, कचरा ठेकेदाराच्या अंगावर टाकण्यात सांगण्यात येते. त्यानुसार दोघे जण ठेकेदाराच्या अंगावर गटातील घाण टाकताना दिसतात. या प्रकारामुळे लांडे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. तर अनेकांनी लांडे यांच्या कृत्याचे समर्थन करत ठेकेदाराला हिसका दाखवल्याचे म्हटले आहे. 

या प्रकाराविषयी बोलताना लांडे म्हणाले, ठेकेदाराने त्याचे काम योग्यप्रकारे न केल्याने मला हे करावे लागले. मागील 15 दिवसांपासून मी ठेकेदाराला रस्ता स्वच्छ करण्याची विनंती करत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते हे काम करत आहेत. हे माहिती झाल्यानंतर ठेकेदार तिथे आला. ही त्याची जबाबदारी असून त्याने ते काम केले पाहिजे, हे त्याला सांगितल्याचे लांडे म्हणाले.

दरम्यान, मुंबई मान्सून दाखल झाल्यानंतर सुरूवातीचे दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नियंत्रण कक्षात जाऊन पहाणी करावी लागली. हवामान खात्यानेही दोन दिवस कोकणासह मुंबई व महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा दिला आहे. कोकण व मुंबईला अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com