शरद पवार-प्रशांत किशोर यांची तिसरी भेट अन् तिसऱ्या आघाडीची चर्चा

प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी मुंबईत शरद पवार यांची पहिली भेट घेतली होती.
Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi
Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पवारांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बुधवारी दिल्लीत पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मागील 15 दिवसांतील ही तिसरी बैठक असल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi)

प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी मुंबईत शरद पवार यांची पहिली भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर प्रशांत किशोर व पवार यांच्यात सोमवारी पुन्हा बैठक झाली. तर मंगळवारी पवार यांच्या घरी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंच या व्यासपीठाच्या अंतर्गत ही बैठक घेण्यात आली. ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी होत असल्याची चर्चा होती. पण बैठकीतील नेत्यांनी काँग्रेसला वगळून कोणतीही तिसरी आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केलं होतं.

या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा एकदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याचा दावा काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही केला होता. पण 15 दिवसांत तीनवेळा भेट झाल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांनाही ते भेटले होते, पण ही भूमिका थेट नव्हती, अनौपचारिक केलेली मदत शिवसेनेला शिवसेनेला सत्तास्थापणेसाठी खूप फायदेशीर ठरली. 2024 च्या निवडणुका जरी लांबणीवर असला तरी त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापासूनच केलीय. अनेक बैठका, चर्चा, त्याचप्रमाणे मतदार त्यांच्याशी संवाद अशा पद्धतीची तयारी सध्या राष्ट्रवादीची तर सुरूच आहे. पण याच सोबत प्रशांत किशोर यांची साथ मिळाली ते 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यास मदत होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com