पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकरांना अज्ञातस्थळी हलवलं.. - shadi wari bandatatya karadkar in police custody for demand of wari  | Politics Marathi News - Sarkarnama

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकरांना अज्ञातस्थळी हलवलं..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

आमदार महेश लांडगे हे याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा करीत आहेत

पुणे : यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. त्यांना अज्ञास्थळी हलविण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे हे याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा करीत आहेत.shadi wari bandatatya karadkar in police custody for demand of wari 

बंडातात्या कराडकरांना  सकाळी ताब्यात घेतल्यानंतर च-होली येथील संकल्प मंगल कार्यालयात पोलिसांच्या नजरकैदमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र वारकरी संप्रदाय या परिसरात येत असल्याने बंडातात्या कराडकरांनी पोलीसांनी अज्ञातस्थळी हलवले आहे. 

समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.

बिल्डर अविनाश भोसलेंच्या मुलाचा ईडीकडून जबाब

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सुमारे पाच तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख