बिल्डर अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून पाच तास चैाकशी - ed interrogates avinash bhosale son amit for 5 hours | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

बिल्डर अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून पाच तास चैाकशी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

ईडीने नव्याने गुन्हा दाखल करून ही चौकशी सुरू केली आहे.

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सुमारे पाच तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ed interrogates avinash bhosale son amit for 5 hours

काही दिवसांपूर्वीच ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. विदेशी चलन नियंत्रण कायदा-१९९९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, त्यांची भारताबाहेर असलेली फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. तसेच भोसले यांच्या ‘एबीआयएल’ या रिअल इस्टेट कंपनीने नोकरदारांच्या घरांच्या बांधकामासाठी राखीव असलेल्या भूखंडावर व्यावसायिक इमारत बांधून त्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

त्यावरून ईडीने नव्याने गुन्हा दाखल करून ही चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अमित भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला. अविनाश भोसले यांना यांना 1 जुलै रोजी तर अमित यांना आज 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. त्यानुसार अमित भोसले काल ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची काल पाच तास कसून चौकशी झाली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. गेल्याच महिन्यात ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (फेमा) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती.  भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमाच्या उल्लंघन करत दुबईत मालमत्ता संपादन केल्याचे ईडीला आढळलं होतं.

ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी झाली होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे.  रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख