आम्हाला न्याय द्या..आमदार, खासदार  तुमची जबाबदारी काय ? संभाजीराजें संतापले..

मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
Sarkarnama Banner - 2021-06-06T120230.751.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-06T120230.751.jpg

रायगड : शिवराज्यभिषेक दिनानिमित्त रायगडावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा आरक्षणाविषयी राज्य व केंद्र सरकारवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तोफ डागली.  मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणत संभाजीराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली. sambhaji raje bhosale on maratha reservation shivrajyabhishek on raigad

संभाजीराजे म्हणाले की,  आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडला नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही.  खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. 

"लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ," असे संभाजीराजे म्हणाले. 

"पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकराने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी सत्ताधारी आणि विरोधकांचा समाचार घेतला.

आता मी गप्प बसणार नाही, संभाजीराजेंचा १६ जून रोजी आंदोलनाचा एल्गार..
 
रायगड  : खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची हाक दिली आहे. ता. १६ जूनपासून शाहूमहाराज समाधीपासून आंदोलन करण्यात येणार आहे, सर्व पक्षीय नेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी राजेंनी केलं आहे.  संभाजीराजेंनी आज शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन ही घोषणा केली.  येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असे  संभाजीराजेंना सांगितलं.  रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारले आहे. "तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल," असं म्हणतं संभाजीराजेंनी आंदोलनाची घोषणा केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com