आता मी गप्प बसणार नाही, संभाजीराजेंचा १६ जून रोजी आंदोलनाचा एल्गार.. - Sambhaji Raje Maratha Reservation agitation on 16th June | Politics Marathi News - Sarkarnama

आता मी गप्प बसणार नाही, संभाजीराजेंचा १६ जून रोजी आंदोलनाचा एल्गार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून आंदोलनाला सुरुवात होईल

रायगड  : खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची हाक दिली आहे. ता. १६ जूनपासून शाहूमहाराज समाधीपासून आंदोलन करण्यात येणार आहे, सर्व पक्षीय नेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी राजेंनी केलं आहे.  संभाजीराजेंनी आज शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन ही घोषणा केली.  Sambhaji Raje Maratha Reservation agitation on 16th June  

येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असे  संभाजीराजेंना सांगितलं.  रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारले आहे. "तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल," असं म्हणतं संभाजीराजेंनी आंदोलनाची घोषणा केली. 

  
संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत ठाकरे सरकारला 6 जूनपर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवताना संभाजीराजे आज शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन ही घोषणा केली. 
 
राज्यभर दौरा केल्यानंतर आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजेंनी मुंबईत पत्रकार परिषदही घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारकडे प्रामुख्यानं पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. गरज पडल्यास नवा पक्ष स्थापन करण्याची मनिषादेखील संभाजीराजेंनी बोलून दाखवली होती. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झालेले संभाजीराजे आज मराठा आरक्षणाबाबत कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी भेट घेत सर्वसहमती घडविण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय करता येईल, यासाठीचे काही मुद्दे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले. राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.   

मी आज येऊन टपकलेलो नाही, असे म्हणणाऱ्यां संभाजीराजेंच्या मनात काय चाललयं? 
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje पुन्हा चर्चेत आले आहेत. विविध नेत्यांशी गाठीभेटी, नव्या राजकीय समीकरणांची सुरवात, मराठा संघटनांना Maratha reservationएकत्र आणण्याचा प्रयत्न अशा विविध पातळ्यांवर ते सक्रिय झाले आहेत. सहा जून रोजी शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याची मोहीमही त्यांनीच सुरू केली. संभाजीराजे आता नव्या राजकीय भूमिकेत तर जात नाही ना, असेही बोलले जात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख