RSSची आज बैठक, योगी आदित्यनाथांबाबत महत्वपूर्ण निर्णय.. - rss meeting in delhi focus on yogi govt up bengal election  | Politics Marathi News - Sarkarnama

RSSची आज बैठक, योगी आदित्यनाथांबाबत महत्वपूर्ण निर्णय..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासमोर आगामी उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांचे आवाहन आहे. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव, निवडणुकीनंतरचा हिंसाचार, उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण, किसान आंदोलन, कोरोनासाठीच्या उपाययोजना आदी विषयावर आज दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची RSS बैठक होत आहे. या बैठकीत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, संघाचे पदाधिकारी, भाजपचे वरिष्ठ नेता उपस्थित राहणार आहेत. rss meeting in delhi focus on yogi govt up bengal election

ही बैठक नेहमीप्रमाणे होणाऱ्या बैठकीसारखी नियोजित बैठक असली तरी सध्याच्या राजकीय वातावरणामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.  ता. ३ जून रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, काही केंद्रीय मंत्री आरएसएसच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर या बैठकीचे आयोजन केले जात आहे. 

भाजपचे सर्वात ताकदवार मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ ओळखले जातात, पण सध्या त्यांच्या विरोधात भाजपच्याच काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसात भाजपचे मंत्री बी.एल. संतोष यांनी लखनऊ येथे योगी सरकारमधील काही मंत्र्यांची गुप्त बैठक घेतली होती. त्यांच्याकडून उत्तरप्रदेशातील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. आता भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासमोर आगामी उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांचे आवाहन आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ज्या पद्धतीने भाजप निवडणुक रिंगणात उतरला होता. त्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले नाही, तर भाजप तृणमूल कॅाग्रेसला चांगली टक्कर देईल असे वाटत होते पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. निवडणुकीनंतर  हिंसाचाराला भाजपला जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे भाजप सध्या यामुळे चिंतेत आहे.  

नितीशकुमारांवर चिखलेफक पडली महागात; भाजप आमदाराला थेट घरचा रस्ता
 
पाटणा : बिहारमध्ये (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार सत्तेवर आहे. मात्र, भाजपच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. आता या आमदाराला नितीशकुमारांवर टीका करणे महागात पडले आहे. भाजपने त्याच्यावर कारवाईचा दंडुका उगारला आहे. त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.  आमदार टुन्ना पांडे यांच्या विधानांचा भाजपने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने पांडे यांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांना दहा दिवसांच्या आत यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणाही त्यांना करण्यात आली आहे. आता त्यांना तातडीने पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनाही पांडे यांच्यावर कारवाईची मागणी पक्षाकडे केली होती. 

Edited by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख