राजू शेट्टी यांचा पत्ता कट...राज्यपालांकडे हेमंत टकले यांचं नाव?

विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीराज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Raju Shettys name has been dropped from the list of 12 members
Raju Shettys name has been dropped from the list of 12 members

मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावरून अजूनही घोळ सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यवालांकडे शिफारस केलेल्या 12 नावांपैकी माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याचं वृत्त आहे. त्यांच्याजागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते हेमंत टकले (Hemant Takle) यांचं नाव राज्यपालांकडे गेल्याचं समजतं. (Raju Shettys name has been dropped from the list of 12 members)

विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादीतील काही नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची चर्चा असून त्यात ईडीकडून चौकशी सुरू असलेले एकनाथ खडसे आणि विविध आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राजू शेट्टींच्या नावांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून शेट्टी यांचे नाव यादीतून मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. 

या चर्चेदरम्यानच आता नवीन माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांचं नाव वगळून हेमंत टकले यांच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस केल्याचं समजते. त्यामुळे शेट्टी यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी पक्ष पातळीवर अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. दरम्यान, शेट्टी यांचं नाव वगळल्याबाबत अद्याप महाविकास आघाडी सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, राजू शेट्टी यांच्यासह अन्य काही सदस्यांच्या नियुक्तीवरून तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याचं बोललं जात आहे. मागील निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर राष्ट्रवादीच्या यादीतून देण्यात आलेल्या दोन नावांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादीच्या यादीतून सूचविलेल्या नावांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रा. यशपाल भिंगे यांचा मागील निवडणुकीत पराभव झालेला आहे. शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव झाला आहे. 

दुसरीकडे, प्रा. भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. तसेच शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी सूचविण्यात आलेले आहे. त्यांनीही काँग्रेसकडून मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यात त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून शिवबंधन हाती बांधले होते. शिवसेनेत आल्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या जागेसाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com