मागे वळून थुंकलो तर मुख्यमंत्री अन् मंत्रिमंडळ वाहून जाईल!

त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.
BJP Leader D. Purandeshwaris controvercial comment on CM
BJP Leader D. Purandeshwaris controvercial comment on CM

रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकर्ता शिबीरामध्ये मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. मागे वळून थुंकलं तर त्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ वाहून जाईल, असं पक्षाच्या छत्तीसगड प्रभारी डी. पुरंदेश्वरी म्हणाल्या आहेत. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. (BJP Leader D. Purandeshwaris controvercial comment on CM)

बस्तर येथे भाजपचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू होते. गुरूवारी या शिबीराच्या अखेरच्या दिवशी पुरंदेश्वरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'पक्षाला 2023 मध्ये पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प करून मैदानात उतरल्यास आपल्या विजय नक्की आहे. आपण मागे वळून थुंकले तरी मुख्यमंत्री भूपेश बघेल व मंत्रिमंडळ वाहून जाईल.' पुरंदेश्वरी या 2014 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्या आहेत. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या त्या कन्या आहेत. काँग्रेसकडून त्या दोनवेळा खासदार होत्या. 

काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडायचा असेल तर सर्वांना माहिती आहे की, गांधी परिवारातीलच सदस्य बनेल. पण भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही. भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचे असेल तर एखादा कार्यकर्ता अध्यक्ष बनतो. हा पक्ष आपल्या कार्यकर्त्यांकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका चहा विक्री करणाऱ्या कुटूंबातील आहे. ते आपल्या पक्षाला आपली आई मानतात. त्यांनी पक्षाची सेवा केली अन् पक्षानं त्यांच्या सन्मान केला. अशाच पध्दतीने कार्यकर्त्यांनी निश्वार्थीपणे काम केल्यास पक्ष त्यांचा सन्मान नक्की करेल, असे पुरंदेश्वरी म्हणाल्या.

दरम्यान, या शिबीरासाठी काही माजी आमदार नेत्यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्तीसगढमधील विधानसभेच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित चिंतन शिबीरात डावलल्यानं माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडं तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

शिबीरात न बोलवल्यावरून एका माजी आमदाराने नाराजी व्यक्त केली. शिबीरासाठी पक्षानं मला निमंत्रित का केलं नाही, याची कल्पना नाही. माझ्यासह इतर नेत्यांना अशी वागणूक का दिली, याविषयी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आणखी एका नेत्यानं आपल्याला डावलून पक्षाने मोठी चूक केल्याचं सांगितलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com