राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे "शिळ्या कढीला ऊत"

राष्ट्रवादीच्या या टि्वटला भाजपचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Ram Kadam19.jpg
Ram Kadam19.jpg

मुंबई : "देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने टि्वट केलं होते. राष्ट्रवादीच्या या टि्वटला भाजपचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

"राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत‘ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?" असं टि्वट करत राम कदम यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीत यशवंत सेनेची उडी..संजय माने यांना उमेदवारी
 
पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. याला राम कदम यांनी उत्तर दिले आहे. राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे दीड तास पवार व देशमुखांमध्ये चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर देशमुख यांनी चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच सचिन वाझे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यातच आज देशमुख दिल्लीत पवारांची भेट घेतली. 

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की मुंबईतील घडामोडींविषयी शरद पवार यांना माहिती दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके व मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. राज्य सरकारकडून त्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासामध्ये जे दोषी आहेत, त्यांची नावे यायला हवीत. एनआयएच्या अंतिम चौकशी अहवालानतर पुढील कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीसह इतर मुद्यांवर बोलण्यास देशमुख यांनी नकार दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com