संभाजीराजे- आंबेडकरांच्या भेटीकडं राज्याचं लक्ष..पुण्यात आज शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?  - political mp Sambhaji Chhatrapati will float new political party | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजे- आंबेडकरांच्या भेटीकडं राज्याचं लक्ष..पुण्यात आज शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

संभाजीराजे नवा पक्ष काढतील का..शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार का, अशा  प्रश्नांची चर्चा  सोशल मीडियावर सुरु आहे.

पुणे : ''बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवीन राजकीय पक्षाचा विचार केला जाईल,'' असे विधान खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पक्ष येणार, या चर्चेला उधाण आले आहे. political mp Sambhaji Chhatrapati will float new political party

संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे. आज ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहेत. त्यांच्या या भेटीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीतनंतर संभाजीराजे नवा पक्ष काढतील का..शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का, अशा  प्रश्नांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी काल राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदींना भेटले.  संभाजीराजे आज दुपारी चार वाजता  पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आरक्षणावर चर्चा करणार आहेत. या भेटीत राज्यात नवीन समीकरणे स्थापित करण्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

मोदींजी, १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय..तुम्ही ३० मिनिटं वाट पाहू शकत नाही..

सोशल मीडियातून संभाजी छत्रपती यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे संभाजीराजे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या चर्चेने जोर धरला आहे. ‘मराठा समाजातील तरुणांचे एकच लक्ष्य, छत्रपती संभाजीराजेंनी काढावा नवीन राजकीय पक्ष’, अशा आशयाचा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल केला जात आहे. अनेक तरुणांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेट्सवर हा मजकूर ठेवला आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्याने समाज अशांत आहे. तो कधीही रस्त्यावर येऊ शकतो. मात्र हा समाज माझ्यामुळे शांत आहे. त्याचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला केले. राज्य सराकरने पाच जूनपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा कोरोना असो की कोणती परिस्थिती आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.  

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी भेट घेत सर्वसहमती घडविण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय करता येईल, यासाठीचे काही मुद्दे त्यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले. राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 
Edited by : Mangesh Mahale    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख