मोदींजी, १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय..तुम्ही ३० मिनिटं वाट पाहू शकत नाही.. - waiting 7 years for 15 lakhs tmc mp mahua moitra Criticized  pm modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मोदींजी, १५ लाखांसाठी ७ वर्षापासून वाट पाहतोय..तुम्ही ३० मिनिटं वाट पाहू शकत नाही..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

आम्ही एटीएमच्या बाहेर, कधी लसीकरणासाठी रांगेत उभे आहोत, तुम्हीही कधी कधी वाट पाहत जा..

कोलकता : पश्चिम बंगाल मधील यास वादळाचा आढावा घेणारी बैठक वादळी ठरत असून तृणमूल कॅाग्रेस आणि भाजप यांचे शाब्दीक युद्ध रंगले आहे. पंतप्रधान मोदीच्या बैठकीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय तीन मिनिटं उशिरा पोहचले, यावरुन बंगालमध्ये यास नंतर राजकीय क्षेत्रात नवीन वादळ निर्माण झाले आहे. तृणमूल कॅाग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मोदींवर तोफ डागली आहे. waiting 7 years for 15 lakhs tmc mp mahua moitra Criticized  pm modi

महुआ मोइत्रा यांनी टि्वट करुन मोदींवर निशाना साधला आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, तीस मिनिटं उशिर झाला म्हणून काय झालं. पंधरा लाख रुपये आमच्या खात्यावर जमा होणार म्हणून आम्ही भारतीय सात वर्षापासून वाट पाहत आहोत. आम्ही एटीएमच्या बाहेर, कधी लसीकरणासाठी रांगेत उभे आहोत, तुम्हीही कधी कधी वाट पाहत जा..

काल यास वादळाने झालेल्या चक्रिवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना तेथील मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी   यांनी  अर्धा  तास  वाट  पाहायला  लावली.  त्या आल्या पण  त्या पंतप्रधानांसोबत फक्त पाच मिनिटे उपस्थित होत्या. नुकसानीचे निवेदन पंतप्रधानांच्या हातात दिले आणि त्या लगेच निघाल्या. तेथील मुख्य सचिव त्या बैठकीत सादरीकरण करणार होते. मात्र त्यांनाही हाताला ओढून घेऊन त्या घेऊन गेल्या. या साऱ्या घटनांवरून मोठा राजकीय धुरळा उडाला आहे. 

नरेंद्र मोदी  यांना तीस मिनिटे वाट पाहायला लावणं हे पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना चांगलेच महागात पडले. यामुळे त्यांना पदावरुन हटविण्यात आले आहे.  त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलप्पन बंदोपाध्याय यांची बदली केली आहे. बंदोपाध्याय यांना केंद्र सरकारकडे अहवाल देण्यास सांगितले आहे. यास वादळाने झालेल्या चक्रिवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांना तेथील मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी  अर्धा  तास  वाट  पाहायला  लावली. 

पंतप्रधान यायच्या आधी मुख्यमंत्री उपस्थित असणे राजशिष्टाचारनुसार आवश्यक असताना त्याविरोधी कृती ममता यांनी केली. मुख्य सचिव बंदोपाध्याय हेही ममतादीदी समवेत अर्धा तास उशिरा बैठकीस पोहचले. त्यामुळे भाजने नेत्यांनी ममता दीदी व बंदोपाध्याय त्यांच्यावर टीका केली आहे. बंदोपाध्याय यांना ३१ मे रोजी नार्थ ब्लॅाक कर्मचारी प्रशिक्षण विभागात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारने त्यांना बदलीचे पत्र दिले आहे. 

तृणमूल कॅाग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंद्रु शेखर रॅाय म्हणाले की भारताच्या इतिहास हे प्रथमच होत आहे की एका राज्याच्या मुख्य सचिवाला बळजबरी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. मोदी सरकार इतक्या खालच्या पातळीवर येतील, असे वाटलं नव्हतं. बंगालच्या जनतेने निवडणुकीत भाजपला धडा शिकवून ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री केलं, म्हणून भाजप अशा पद्धतीनं वागत आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख