गंगाजलानं शुद्धीकरण करुन TMCच्या दोनशे कार्यकर्त्यांची घरवापसी - political bjp workers jump ship and join tmc west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

गंगाजलानं शुद्धीकरण करुन TMCच्या दोनशे कार्यकर्त्यांची घरवापसी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जून 2021

''भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे ही आमची मोठी चुक होती, ''

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते, पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्यातील अनेक जण आता घरवापसी करीत आहेत. political bjp workers jump ship and join tmc west bengal

हुबळी जि्ल्ह्यातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांना आता भाजपला रामराम ठोकून पुन्हा तृणमूल कॅाग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ''भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे ही आमची मोठी चुक होती, '' असे या कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितलं.  

भाजपमधून तृणमूलमध्ये घरवापसी करताना त्यांनी गंगाजलने आपले शुद्धीकरण केलं. भाजपमध्ये गेल्याच्या चुकीसाठी त्यांनी मुंडण केलं. त्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. 
''निवडणुकीपूवी भाजपने गोड बोलून आम्हाला गळ घातली, भाजप फ्राँड पक्ष आहे. आम्हाला ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही,'' असे या कार्यक्रर्त्यांना सांगितलं. 

योगींची डोकेदुखी वाढली; उपमुख्यमंत्री पदासाठी मित्रपक्षाचा भाजपला अल्टीमेटम
 लखनऊ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारची डोकेदुखी वाढतच चालली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी पक्षातील नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मित्रपक्षाकडून मागण्या वाढू लागल्या असून त्या मान्य न केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.  विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे कामही भाजपला करावं लागत आहे. मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीने आता दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी आहे. काही आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने सातत्याने बैठका होत आहेत. आता निषाद पक्षाचे अध्यक्ष डॅा. संजय निषाद यांनीही भाजपला अल्टीमेटम दिला आहे.
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख