योगींची डोकेदुखी वाढली; उपमुख्यमंत्री पदासाठी मित्रपक्षाचा भाजपला अल्टीमेटम

विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे.
Nishad Party Chief Sanjay Nishad demands deputy cm post from BJP
Nishad Party Chief Sanjay Nishad demands deputy cm post from BJP

लखनऊ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारची डोकेदुखी वाढतच चालली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी पक्षातील नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मित्रपक्षाकडून मागण्या वाढू लागल्या असून त्या मान्य न केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. (Nishad Party Chief Sanjay Nishad demands deputy cm post from BJP)

विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. आपल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे कामही भाजपला करावं लागत आहे. मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीने आता दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी आहे. काही आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने सातत्याने बैठका होत आहेत. आता निषाद पक्षाचे अध्यक्ष डॅा. संजय निषाद यांनीही भाजपला अल्टीमेटम दिला आहे.

भाजपने 2022 च्या निवडणुकीत आपल्याला उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. भाजपने असे केले नाही, तर त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागेल, अशी इशारा संजय निषाद यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशात निषादांची संख्या पाहता भाजपने त्यांच्या नेत्यांना संधी द्यायला हवी. भाजपने आम्हा दु:ख दिलं तर त्यांनाही दु:खाचाच सामना करावा लागेल, असे निषाद यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये निषाद पक्षाला डावलल्याने भाजपला नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे संजय निषाद यांच्याकडून भाजपवर दबाव टाकण्यास सुरूवात कऱण्यात आली आहे. निषाद पक्षाचा उत्तर प्रदेशातील 169 जागांवर प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या जाण्यामुळं भाजपला निवडणुकीत नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला. पक्षाने राज्यसभेतील एक जागा किंवा उत्तर प्रदेशातील मंत्रीमंडळात महत्वाचं खातं मागितलं होतं. पण ही मागणीही मान्य झाली नाही, असे निषाद यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये निषाद पक्षाचा केवळ एक आमदार आहे. तर संजय निषाद यांचा मुलगा प्रविण हे भाजपचे खासदार आहे. संजय निषाद यांनी नुकतीच नड्डा यांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी 160 जागांची मागणी केली. जवळपास 70 जागांवर निषादचे मतदार 75 हजारांहून अधिक आहेत. मला उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यास त्याचा फायदा भाजपलाच होईल, असे निषाद म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com