राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जेव्हा "झिंगाट" होतात..(व्हिडिओ पाहा)  - ncp mla rohit pawar dance on zingat song of sairat film in covid centre | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जेव्हा "झिंगाट" होतात..(व्हिडिओ पाहा) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

रोहित पवार यांनी सोमवारी गायकरवाडी  येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची भेट घेतली.

कर्जत :  गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये गंभीर वातावरण कमी व्हावे, यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी सोमवारी गायकरवाडी  येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची भेट घेतली. यावेळी तिथं सैराटमधील झिंगाट गाण्यावर रुग्णा नृत्य करीत होते. ncp mla rohit pawar dance on zingat song of sairat film in covid centre 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarkarnama (@sarkarnamanews)

‘झिंगाट’ गाण्यावर कोविड सेंटरमधील आजींनीही ठेका धरला आणि आणि रोहित पवारांना या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही तेथील रुग्णांसोबत ठेका धरला.  त्यांच्या या ‘झिंगाट’ नृत्यामुळे रुग्ण आणि उपस्थितांनी आश्चर्य़ व्यक्त केलं.  यावेळी रोहित पवारांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला.  

रोहित पवार यांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.  “गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो”, असे रोहित पवारांनी टि्वट केलं आहे. रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.  
 
हेही वाचा :  रोहित पवारांनी शेतकऱ्यांची चिंता मिटविली, मोठ्या गोदामांना मंजुरी
 
कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव व जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे पाच कोटी 74 लाख रुपये खर्च करून प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांना राज्य वखार महामंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याच्या चिंता कायमची मिटणार आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर मका, तूर यासह धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी बाजार समितीच्या गाळ्यांचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे शेतमालाची पूर्णपणे खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. शेतमाल ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याची दखल घेत पवार यांनी दोन्ही तालुक्‍यांत गोदामे होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, मिरजगाव व खर्डा येथे गोदामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याची चिंता संपली आहे. 
Edited by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख