आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांची चिंता मिटविली, मोठ्या गोदामांना मंजुरी - Rohit Pawar alleviates farmers' worries, approves large godowns | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांची चिंता मिटविली, मोठ्या गोदामांना मंजुरी

निलेश दिवटे
मंगळवार, 25 मे 2021

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव व जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे पाच कोटी 74 लाख रुपये खर्च करून प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांना राज्य वखार महामंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याच्या चिंता कायमची मिटणार आहे. (Rohit Pawar alleviates farmers' worries, approves large godowns)

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर मका, तूर यासह धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी बाजार समितीच्या गाळ्यांचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे शेतमालाची पूर्णपणे खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. 

शेतमाल ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याची दखल घेत पवार यांनी दोन्ही तालुक्‍यांत गोदामे होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, मिरजगाव व खर्डा येथे गोदामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याची चिंता संपली आहे. 

मिरजगाव, खर्डा येथे गोदामे

मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर अपुऱ्या जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल घेता येत नव्हता. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मिरजगाव व खर्डा येथे वखार महामंडळाकडून गोदामे उभारणीस मान्यता मिळाली आहे. 

- आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड 
 

हेही वाचा..

पुणतांबेत व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक 

पुणतांबे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुले पुणतांबेत आहे. व्यापारी, फळ विक्रेते, दूध विक्रेते, कृषी केंद्रचालक आदींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अजिनाथ कडलक यांनी दिली. 

कोरोना संसर्ग काळात सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या देखरेखेखाली या भागात विविध उपाय योजना करुन कोरोना साथीवर नियंत्रण मिळविले होते. परंतु दुसऱ्या लाटेत या परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या सहा दिवसांपासून गावात कडक लॉंकडाऊन पाळला जात आहे. 26 मेपासून दुकाने उघडली जाणार आहेत. दुकाने उघडण्यासाठी व्यापारी फळविक्रेते, दूध विक्रेते आदींना कोरोना चाचणी अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे. व्यापाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन कोरोना सुरक्षा समितीने केले आहे. जे व्यापारी कोरोना चाचनी न करता दुकाने उघडतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.असे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे. 

 

हेही वाचा..

महापालिकेचे कोविड सेंटर महिलांसाठी

 

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख