फडणवीसजी,  "तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या..."नवाब मलिकांचे प्रत्युत्तर 

गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा' असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला.
फडणवीसजी,  "तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या..."नवाब मलिकांचे प्रत्युत्तर 
4Sarkarnama_20Banner_20_202021_03_26T213942.907.jpg

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnvis यांनी महाविकास आघाडी सरकारवर MVA Goverment मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली होती. फडणवीसाच्या टीकेला राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  'आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा' असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला. नवाब मलिक यांनी टि्वट करुन फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ncp leader nawab malik slammed devendra fadnavis on the issue of maratha reservation

मराठा आरक्षणावरुन काल फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. फडणवीस म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

केंद्राने राज्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्य सरकार एखाद्या समाजाला मागास घोषित करू शकतं. मागासवर्ग आयोगाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केंद्र सरकार करू शकत नाही. सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी माशा मारायच्या का?, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. 

'अशोक चव्हाण साहेबांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकत यासंदर्भात विचार करून त्या संदर्भात निर्णय केला पाहिजे,आता 50 टक्क्यावरचं आरक्षण जे स्टेट लॉने दिला होता, राज्याच्या कायद्यानं दिलं होतं, त्यामुळे याच्या विरुद्ध पुनर्विचार याचिका केंद्र सरकार अशी करेल, राज्यालाच ती करावी लागेल, सर्व समजतं, सर्व माहिती आहे, मात्र आपलं अपयश लपविण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे ही लोकं आहे' अशी टीकाही फडणवीस यांनी केली होती. 
 Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.