राष्ट्रवादी आमदार पूत्राला अद्याप अटक नाही..अपहरण, खूनाच्या प्रयत्नात दोघे जेरबंद...

आमदारांच्या दोन कार्यकर्त्यांना निगडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
राष्ट्रवादी आमदार पूत्राला अद्याप अटक नाही..अपहरण, खूनाच्या प्रयत्नात दोघे जेरबंद...
Sarkarnama Banner - 2021-05-15T114110.552.jpg

पिंपरीः राष्ट्रवादी कॅाग्रेसचे  पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात बुधवारी (ता. १२)झालेल्या गोळीबारप्रकरणी दाखल परस्परविरोधी खूनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यांत पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. गोळीबार करणाऱ्या तानाजी पवारचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदारांच्या दोन कार्यकर्त्यांना निगडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी आमदार पूत्राला अद्याप अटक झालेली नाही. police has started action of arrest in firing in mla  Anna Bansode office 

बुधवारी दुपारी बनसोडे यांच्या कार्यालयात गोळीबार झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा व्यवस्थापक तानाजी पवार याने तो केला होता. मात्र, त्यापूर्वी सकाळी त्याचे त्याच्या आकुर्डीतील कार्यालयातून आमदार बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांनी अपहरण केले. त्याला चिंचवडस्टेशन येथील आमदारांच्या कार्यालयात आणून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत जखमी पवार अद्याप रुग्णालयात उपचार घेत असल्याचे  पोलिसांनी सांगितले. तर, त्याच्यावर हल्ला करणारे रोहित ऊर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. निगडी) व सुलतान इम्तियाज कुरेशी (वय २०, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींबाबत तपास व चौकशी सुरु असल्याचे तपासधिकारी कृष्णदेव खराडे यांनी सांगितले. 

दरम्यान, पवार जखमी असल्याने तो आरोपी व आमदारांचा कार्यकर्ता फिर्यादी असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले. पवार याने बनसोडेंच्या कार्यालयात उर्मट वागत गोळीबार केला असल्याची उलट तक्रार आमदारांचा कार्यकर्ता सावनकुमार सलादल्लू याने दिलेली आहे. त्यात दाखल गुन्ह्यात पवार अद्याप उपचार घेत असल्याने त्याला अटक केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा BJP खासदाराच्या घरीच लसीकरण..कार्यकर्ते, समर्थकांसाठी व्हीआयपी व्यवस्था...
उज्जैन: देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे, लशींचा तुटवडा भासत आहे, अशा परिस्थितीत मात्र, काही लोकप्रतिनिधी आपले समर्थक, कार्यकर्त्यांना व्हीआयपी व्यवस्था करून कोरोना लशींकरण करत आहे, तर दुसरीकडे सामान्य जनता उन्हात तासन् तास रांगेत उभी आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या खासदाराने आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांसाठी आपल्या घरी लसीकरण मोहीम राबविली आहे. यावर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी टीका केली आहे. भाजप खासदार अनिल फिरोजिया (उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्या घरी सुरु असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in