तपास यंत्रणा सज्जन लोकांवर कारवाई करत नाहीत! राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

ईडीचा एक साधन म्हणून वापर करून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे, अशी नाराजी शरद पवारांनी यांनी व्यक्त केली आहे.
Narayan Ranes reply to Sharad Pawar over his remark on ED
Narayan Ranes reply to Sharad Pawar over his remark on ED

नवी दिल्ली : ईडीचा एक साधन म्हणून वापर करून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात इतक्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीच्या केसेस ऐकिवात नव्हत्या, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Narayan Ranes reply to Sharad Pawar over his remark on ED)

नारायण राणे यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या नाराजीवर वक्तव्य केलं आहे. सज्जन लोकांवर केंद्रीय  तपास यंत्रणा कारवाई करत नाहीत. शरद पवार यांच्या व्याख्येत कोणता नेता कुठे बसतो हे मला माहिती नाही. अनिल देशमुख, अजित पवार ही गुणी माणसं आहेत, कोणता गुन्हा करत नाहीत, असं म्हणत राणे यांनी टोला लगावला. 

राज्याच्या अधिकारांवर केंद्र सरकार अतिक्रमण करत आहे, असं वाटत असेल तर त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटावं. इतर वेळेस ते भेटतात आणि सांगतात, असा सल्लाही राणे यांनी पवारांना दिला. 

काय म्हणाले होते शरद पवार?

संस्थांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडी या संस्थेच्या माध्यमातून होते. मात्र मागील काही वर्षांपासून ईडीची नवीन यंत्रणा लोकांच्या परिचयात आली आहे. ईडीचा एक साधन म्हणून वापर करून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात इतक्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीच्या केसेस ऐकिवात नव्हत्या. एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी अशा अनेक नेत्यांवर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे ही यंत्रणा कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले. काळ येतो आणि नंतर जातो सुद्धा.  हा काळ जाईल तेव्हा यात दुरुस्ती होईल, असा सूचक इशारा पवार यांनी दिला.

संस्थेमध्ये गैरव्यवहार झाले असल्यास त्याची तक्रार संबंधित विभागाच्या ठराविक संस्थांकडे करता येते. असे असतानाही ईडी त्याठिकाणी जाऊन संबंधित संस्थांमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे राज्याच्या अधिकारांवर एक प्रकारे गदा येत आहे. या गोष्टी योग्य वाटत नसून पुढील अधिवेशनात हा विषय एकत्रितपणे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी यावर सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते योग्यच आहे.  मीदेखील हजारोंच्या संख्येने गर्दी होईल अशा कार्यक्रमांना जाणार नाही. कोरोना संबंधीची सर्व काळजी घेतली असेल अशाच कार्यक्रमांना उपस्थिती लावेल, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाची आपण दखल घेतली नाही तर कोरोनाच्या संभाव्य लाटेत आपल्याला मोठी किंमत द्यावी लागेल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात राहणाऱ्या हिंदू व मुस्लिम समाजाचे पूर्वज एकच असल्याचे मत मांडले आहे.  त्यावर प्रतिक्रिया देताना हिंदू-मुस्लीम समाजाचा मूळ जन्म एका कुटुंबातून झाला आहे, त्यांचे विधान वाचून माझ्याही ज्ञानात भर पडली आहे, असा टोला पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com