चंद्रकांतदादांच्या मागणीला पटोलेंचा पाठिंबा.म्हणाले."निवडणुका घ्या.." - Nana Patole support to Chandrakant patil demand | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांच्या मागणीला पटोलेंचा पाठिंबा.म्हणाले."निवडणुका घ्या.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगावा, असे पटोले म्हणाले. 

मुंबई : कॅाग्रेसचे टुलकिट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं  षडयंत्र आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल व्यक्त केला. चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्या या विधानानंतर कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काल मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं होते. Nana Patole support to Chandrakant patil demand   

"चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल," असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले होते. 

सैाम्या वर्मा यांनी तयार केलं congress toolkit ..सुप्रीम कोर्टात याचिका.. ..भाजप आक्रमक

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, "भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत, हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी भाजपचेच काही नेते करीत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला आहे.

पटोले म्हणाले की, दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणा-या मोदींनी हमीभावाऐवजी शेतक-यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले आहे. सायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. १०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे तर डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी ११८५ रुपये होती ती आता १९०० रुपये केली आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ रुपयांऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख