सैाम्या वर्मा यांनी तयार केलं congress toolkit ..सुप्रीम कोर्टात याचिका..भाजप आक्रमक - politics bjp covid congress toolkit saumya verma | Politics Marathi News - Sarkarnama

सैाम्या वर्मा यांनी तयार केलं congress toolkit ..सुप्रीम कोर्टात याचिका..भाजप आक्रमक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

सौम्या वर्मा यांनी हे टुलकिट तयार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. सैाम्या या कॅाग्रेसच्या कार्यकर्त्यां आहेत.

नवी दिल्ली  :  कोरोना महामारीच्या काळातही कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केली असून या संकटाचा राजकारणासाठी कसा फायदा घ्यायचा हे यात नमूद करण्यात आले आहे. या टूलकिटचा भंडाफोड काँग्रेसमधीलच एकाने केला आहे. यानंतर भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काल काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले की, महामारीच्या काळातही कॉंग्रेस टूलकिटद्वारे जनमानसात गैरसमत पसरवण्याचे काम करत आहे.  politics bjp covid congress toolkit saumya verma

टुलकिट प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. कॅाग्रेसच्या या टुलकिट बाबत वकील शशांक शेखर झा यांनी याचिका दाखल केली आहे. जगात भारताची प्रतिमा खराब करणे, सरकारविषयी जनतेमध्ये अपप्रचार करणे या कारणावरुन कॅाग्रेसच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआईए)च्या माध्यमातून याचा तपास करण्यात यावा, आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ते शशांक शेखर झा यांनी केली आहे. यात दोषी आढळल्यास कॅाग्रेसची मान्यता रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

उजनीचे पाणी पळवणारे खरे सूत्रधार अजित पवार..? शब्द फिरवण्यात पटाईत 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत.  जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे.  आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे संबित पात्रा यांनी काल म्हटलं होते. 

देश कठीण परिस्थितीतून जात असताना काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आली आहे. आता भाजपनेही पलटवार सुरू केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसची एक टूलकिट समोर ठेवली. संबित पात्रा यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केली आहे. संकटाच्या काळातही काँग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसने हे आरोप फेटाळले असून भाजप बनावट टुलकिटचा उपयोग करुन कॅाग्रेसच्या विरोधात समाजात गैरसमज पसरवित आहे. याप्रकरणी संबित पात्रा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याच्या तयारीत कॅाग्रेस आहे.  सध्या सैाम्या वर्मा यांचे नाव ट्रेडिंगमध्ये आहे. 

सैाम्या वर्मा कोण आहेत ? 
सैाम्या वर्मा कोण आहेत, त्या कॅाग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी, राजीव गैाडा यांच्या संपर्कात आहे का, कॅाग्रेसने  याचं उत्तर  द्यावे, असं टि्वट पात्रा यांनी काल केलं आहे.  कॅाग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजीव गैाडा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सौम्या वर्मा यांनी हे टुलकिट तयार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. सैाम्या या कॅाग्रेसच्या कार्यकर्त्यां आहेत. सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव नैाडा, सोनिया गांधी यांच्यासोबत असलेले सैाम्याचे फोटो पात्रा यांनी माध्यमांसमोर उघड केले आहे. 

संबित पात्राच्या म्हणण्यानुसार कॅाग्रेसच्या टूलकिटमध्ये असे म्हटले आहे...

  1. काही प्रकाशनांमध्ये मिसिंग मॅनेजमेंट आणि मिसिंग गव्हर्नमेंट छापा... 
  2. वारंवार पत्र लिहायला लावा. याअंतर्गत कधी सोनिया गांधी, कधी राहुल गांधी तर कधी तथाकथित व्यक्तींकडून पत्र लिहून घ्या. 
  3. पत्र मधूनमधून लिहित राहायचे आहे.
  4. कशा प्रकारे हे पत्र लिहावे हे टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे.
  5. पीएम केअर्स फंडवरूनही विविध प्रश्न विचारायचे आहेत.
  6. Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख