भ्रष्टाचारात अडकलेल्या आणखी एका मंत्र्याचे नाव पुढील आठवड्यात जाहीर करणार

छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यावर सोमय्या यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी प्रतिक्रिया दिली.
Name of another corrupt minister will be announced next week : Somaiya
Name of another corrupt minister will be announced next week : Somaiya

पुणे : परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीच्या समुद्रकिनारी असलेले अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यात यावे, याबाबत लोकायुक्तांकडे शपथपत्र दाखल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करूनही परब मंत्रिमंडळात कसे राहू शकतात? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तर, आता भ्रष्टाचाराच्या यादीत आणखी एक नाव पुढे आले आहे. ती व्यक्ती कॅबिनेट मंत्री असून, पुढील आठवड्यात ते नाव जाहीर करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला. (Name of another corrupt minister will be announced next week : Somaiya)

येथील पत्रकार भवनात गुरुवारी (ता. ९ सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार भावना गवळी यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आणि घोटाळेबाज सरकारला ठिकाणावर आणण्याचे काम सुरूच राहणार, असेही सोमय्या यांनी ठणकावले. 

ठाकरे यांच्या ११ मंत्री आणि नेत्यांची यादी जाहीर केली होती. बारावा खेळाडू जितेंद्र आव्हाड हे असून, आणखी एक राखीव खेळाडू सापडला आहे. ते नाव पुढील आठवड्यात जाहीर करणार आहे. ती व्यक्ती राज्य सरकारच्या कॅबिनेटमधील असल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला. छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यावर सोमय्या यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी प्रतिक्रिया दिली.

खासदार गवळी यांनी २५ कोटी रुपये रिसोड अर्बन सहकारी पतसंस्थेतून रोख काढले आहेत. तरीही ‘ईडी’ का चौकशी करते म्हणून विचारले जात आहे. गवळी यांनी बालाजी पार्टिकल बोर्ड सहकारी साखर कारखान्यात ५५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ते म्हणाले,‘‘ त्यांनी ४४ कोटी केंद्र सरकारच्या एनसीडीसी आणि ११ कोटी स्टेट बॅंकेकडून घेतले. हा कारखाना सुरू होण्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्याच भावना ॲग्रो कारखान्याला २५ लाखांत विकला.’’ 
 
....तर राणे यांच्यावरही कारवाई करा 

सोमय्या यांनी यापूर्वी नारायण राणे यांच्या जुहू येथील अनधिकृत बंगल्याबाबत माहिती बाहेर काढली, तरी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. त्यावर सोमय्या म्हणाले, ‘‘भाजपमधील आमच्यापैकी कोणीही चुकीचे काम करीत असेल तर कारवाई करा. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील असून, ठाकरे यांनी जरूर चौकशी करून, कायदेशीर कारवाई करावी.’’ 

किरीट सोमय्या म्हणाले की, मी जिवाला घाबरत नाही. पण, ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांना घाबरण्याची गरज काय? बारामतीला गणेश विसर्जनानंतर जाणार आहे. विसर्जनाची प्रक्रिया बारामतीपासून सुरू करणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सोमय्या यांनी गुरुवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जरंडेश्‍वर साखर कारखाना कर्ज वाटप प्रकरणाची माहिती घेतली. या माहितीसाठी सोमय्या हे सुमारे पाऊण तास जिल्हा बॅंकेत थांबले होते. त्यावेळी त्यांनी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्ज वितरणाची आणि कर्ज वाटप नियमावलीबाबतची माहिती घेतली.  

पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषद संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास माजी खासदार सोमय्या हे पुणे जिल्हा बॅंकेत पोचले. तेथे त्यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांची भेट घेऊन, या कर्ज प्रकरणाची माहिती देण्याची मागणी केल्याचे बॅंकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या वतीने साखर तारणावर कारखान्यांना कर्ज वितरित केले जाते. त्यानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्‍वरला हे कर्ज वाटप केले आहे. परंतु हे वाटप नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com