Jayant Patil invited the Governor to come to Sangli again
Jayant Patil invited the Governor to come to Sangli again

जयंत पाटील राज्यपालांना म्हणाले ‘पुन्हा या...’

सांगलीत यायची इच्छा होती.

सांगली  ः इस्लामपूर मतदारसंघात किल्लेमच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथ मठ आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा विकास केला जात आहे. कोविड साथ कमी झाल्यानंतर मच्छिंद्रगड येथे जानेवारीत राज्यपालांनी पुन्हा यावे, असे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना दिले. पाटील यांच्या त्या आमंत्रणाला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. (Jayant Patil invited the Governor to come to Sangli again)

सिनेअभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांच्या ट्रस्टतर्फे सांगली जिल्ह्यातील एक हजार मुलीचे सामुदायिक विवाह आणि एक हजार मुलींच्या नावे सुकन्या सहाय्य योजनेच्या माध्यमातून ५० हजारांची ठेव ठेवण्यात आली आहे. त्यातील पाच मुलींना राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते आज ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. 

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,‘‘कृष्णा, वारणा काठावरील अनेकांचे आयुष्य अंधारात गेले. मंत्री येतात, आश्वासन देतातय. परंतु पाणी ओसरल्यानंतर काय स्थिती होते. हे भयावह आहे.’’

राज्यपाल कोशि‍यारी म्हणाले, ‘‘सांगलीत यायची इच्छा होती. अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ती पूर्ण झाली आहे. राजकारणात पराभूत झाल्यानंतर लोक थांबतात. मात्र, दीपाली यांनी चांगले काम सुरु ठेवलेय. त्या अशाच काम करत राहिल्या तर राजकारणतही यशस्वी होतील.’’

मी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यानंतर इथे आपत्ती वाढल्या आहेत. महापूर येत आहेत, असे समजू नका. मी उत्तराखंडहून आलो आहे, त्या भागात महापूर नेहमीचाच आहेत, त्यामुळे मी येताना महापूर घेऊन आलोय आणि मी गेल्याशिवाय महापूर थांबणार नाही, असे तुम्ही काही समजू नका, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशि‍यारी यांनी केले. 

खासदार माने यांनी ट्रस्टचे कौतुक केले. पूरग्रस्तांना बळ देण्याचे काम केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यात यापूर्वी अनेक राज्यपाल आले आणि गेले. ते लोकांच्या लक्षात राहिले नाहीत. राज्यपाल कोशियारी मात्र फेमस बनलेत. तुमच्याकडे विरोधक आणि सत्ताधारीही सातत्याने येतात. त्यामुळेच राज्यपालांची ओळख प्रत्येक नागरिकाला झाल्याचे खासदार माने यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांनी दाद दिली.

मोठ्या पदाचाही रस्ता मठातूनच जातो 

योगी आदित्यनाथ यांना खासदार संजय पाटील यांनी किल्ले मच्छिंद्रगडच्या मठात नेले आणि त्यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. संजयकाकांनी मला त्याच मठात नेले आणि मी केंद्रात मंत्री झालो. आता खासदार संजय पाटील यांनाही कुणीतरी त्या मठात न्यावे म्हणजे त्यांना मंत्री होण्याचा योग येईल, असा सल्ला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दिला. काही वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ हे आमदार व्हायच्या आधी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी त्यांना किल्ले मच्छिंद्रगडच्या मठात नेले होते. स्वतः कपिल पाटील यांनीही खासदार तेथे घेऊन गेले होते. या दोघांचे नशीब सध्या जोरात आहेत. संजय पाटील खासदार आहेत. मात्र, त्यापेक्षा मोठ्या पदाचा रस्ता मठातूनच जातो, असा सल्लाही कपिल पाटील यांनी संजयकाकांना दिला. याच मठाला भेट देण्याचे आमंत्रण जयंत पाटील यांनी राज्यपाल कोशियारी यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com