हायकोर्टाच्या दणक्यामुळे महाविकास आघाडीचा आणखी एक मंत्री अडचणीत

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर करण्यात आली होती.
 mumbai hc .jpg
mumbai hc .jpg

मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी लॅाकडाऊनदरम्यान प्रशासकीय कामाची बाब पुढे करत अनेकदा चार्टर्ड प्रवास केला. त्याचा खर्च सरकारी वीज कंपन्यांना भरण्यास भाग पाडले, असा आरोप करणारी जनहित याचिका भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांनी उच्च न्यायालयात केला होता. राऊत यांच्या बेकायदा चार्टर्ड प्रवासावर करण्यात आलेला बेकायदा खर्च वसूल करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासह (एमएसईबी) महाजनको, महाट्रान्स्को आणि महावितरणला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. (mumbai hc seeks reply from maharashtra minister nitin raut)   

या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक यांच्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नितीन राऊतांना २८ जुलैपर्यंत उत्तर देण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे. 

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर करण्यात आली होती. याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती विश्वास पाठक यांनी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत आम्ही केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेणार आहोत. या याचिकेमध्ये तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता वाटत नाही, असे नमूद करत याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, आता न्यायलयाने राऊत यांच्याकडे उत्तर मागितले आहे. 

राऊत यांनी फक्त खासगी कारणांसाठी अवैधरीत्या प्रवास केला असून विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. राऊतांनी या विमान कंपन्यांवर दबाव आणून हे केले आहे, असा आरोप पाठक यांनी केला होता. लॅाकडाऊनदरम्यान राऊत यांनी प्रशासकीय काम म्हणून मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली असा चार्टर्ड प्रवास केला. त्यासाठीचा ४० लाख रुपयांचा खर्च प्रतिवादी वीज कंपन्यांना भरण्यास भाग पडले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.   
Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com