अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा' - bollywood mns poster in front of amitabh bachchan bungalow | Politics Marathi News - Sarkarnama

अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

अमिताभ बच्चन  यांच्या प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे.

मुंबई : बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंत रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही भिंत पाडावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. bollywood mns poster in front of amitabh bachchan bungalow
रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अन्य इमारतींवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर का केली नाही, असा प्रश्न  मनसेनी पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला विचारला आहे. मनसेने बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यासमोर पोस्टर्स लावून आंदोलन केलं. दोन आठवडे होऊन ही या भिंतीवर कारवाई केली नाही, असा हा प्रश्न मनसेने उपस्थित केला.  याबाबतची नोटिस महापालिकेने महानायक बच्चन यांनी दिली आहे. 

जुहू चौपाटी या ठिकाणी अमिताभ बच्चन यांचा असलेला प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरणात जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी प्रतिक्षा बंगल्यावर पोस्टरबाजी केली आहे.

प्रतिक्षा बंगल्यासमोर मनसेने काही बॅनर लावले आहेत. त्यात त्यांनी ''बिगबी” आपले “बिग” हार्ट दाखवा.  मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, असा मजकूर लिहिला आहे. अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, अशी पोस्टरबाजी मनसेने केली आहे.

छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत..शिवसेनेची टिका

मुंबई : पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रोज महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणं कठिण होत चाललं आहे. या विषयावर आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. एकेकाळी महागाईवर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर 'सामना'तून टिकास्त्र सोडण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख