रामदेव बाबांच्या ऐवजी दुसरं कोणी असतं तर भाजपनं चक्काजाम आंदोलन केलं असतं...

संजय राऊत यांनी रामदेव बाबा यांच्या विधानावरुन भाजपवरनिशाणा साधला आहे.
Copy of Sarkarnama Banner (3).jpg
Copy of Sarkarnama Banner (3).jpg

मुंबई : दोन दिवसापूर्वी योगगुरु रामदेव बाबा  Ramdev Baba यांनी  व्हॅाट्सअॅपरील एक मेसेज वाचून दाखवताना त्यांनी अॅलोपॅथी उपचार पध्दतीला फालतू म्हटले होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनीही त्यावर नाराजी व्यक्त करत खरमरीत पत्र लिहिलं आहे. Sanjay Raut targets BJP over Ramdev Baba

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रामदेव बाबा यांच्या विधानावरुन भाजपवर  निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, अॅलोपॅथीवर टीका करणारे बाबा रामदेव यांच्या ऐवजी दुसरे कोणी काही बोललं असतं तर भाजपने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले असतं. 

रामदेव बाबा Ramdev Baba यांनी अॅलोपॅली उपचार पद्धतीला फालतू म्हटलं होते. त्यावरुन देशभरात अॅलोपॅथीच्या डॅाक्टरांनी रामदेव बाबा यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी नाराजी व्यक्त करुन त्यांना खरमरतीत पत्र लिहिलं होते. त्या पत्राला आज रामदेव बाबा यांनी उत्तर दिले आहे. मी माझे विधान मागे घेतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 
  
आज रामदेव बाबा यांनी टि्वट करीत हर्षवर्धन यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात की,  “हे प्रकरण शांत करायचं आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.”  

पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांनी एका शिबिरात  अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. व्हॅाट्स अॅप मेसेज वाचून दाखवताना त्यांनी लाखो लोक अॅलोपॅथीच्या औषधांमुळं मरत आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना तापासाठी दिल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधालाही फालतू म्हटलं. रामदेव बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर IMA ने त्यावर आक्षेप घेतला.

IMA ने रामदेव बाबांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.  आरोग्य मंत्रालयानेही यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात होती. अखेर डॅा. हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. 'संपूर्ण देशवासियांसाठी कोरोना काळात दिवस-रात्र लढणारे डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासमान आहेत. रामदेव बाबांच्या वक्तव्याने त्यांचा अपमान झाला असून देशवासियांच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्यामुळे आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केलं होतं.

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे विधान रामदेव बाबा यांनी केलं होतं.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com