बापरे : भाजपचे आमदारचं जेव्हा रुग्णाच्या सलाईनमध्ये Remdesivir भरतात..व्हिडिओ व्हायरल 

आमदार व्ही.डी. जलावाडिया यांचा रविवारी व्हिडिओ व्हायरल झाला.
Copy of Sarkarnama Banner (2).jpg
Copy of Sarkarnama Banner (2).jpg

सुरत : गुजरातमध्ये भाजपच्या BJP आमदाराने  एका कोविड सेंटरमध्ये चक्क रुग्णाच्या सलाईनमध्ये रेमडेसिविर  Remdesivir इंजेक्शन भरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर कॅाग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  viral video of gujarat bjp mla vd jhalawadia administering remdivisir draws congress derision

सलाईनमध्ये रेमडेसिविर भरताना भाजपचे आमदार व्ही.डी. जलावाडिया VD Jhalawadia यांचा रविवारी व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर कॅाग्रेसचे प्रवक्ता जयराजसिंह परमार यांनी टीका केली आहे.  परमार म्हणाले की, जलावाडिया यांचा व्यक्तीमत्वाचा जलवा पाहून मला खूप दुःख झाले. गुजरातचे आरोग्यमंत्री नितीन पटेल यांनी आमदार जलावाडिया यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, त्यांनी भाजपच्या कार्यक्रत्यांना इंजेक्शन देण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक केंद्र सुरु करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवकांच्या अपुऱ्या संख्येमुळे यंत्रणेवर जो ताण येत आहे, तो कमी होईल. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली
आमदार जलावाडिया यांनी सांगितले की, मी कुठल्याही रुग्णाला इंजेक्शन दिले नाही. मी इंजेक्शन फक्त लोड केले होते. त्यांनी आपला बचाव करताना सांगितले की मी गेल्या चाळीस दिवसापासून या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहे. येथे २०० हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता येथे फक्त १० ते १२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जर कोणाला वाटत असेल मी इंजेक्शन दिलं तर मी त्यांची माफी मागतो. 

हेही वाचा  :  भाजपाप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा : अनंत गाडगीळ
 
पुणे : २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ज्या 'गुजरात मॉडेल' चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली. त्याच गुजरातमधे कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल स्थानिक प्रसार माध्यमांनी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोल सुनावले. यामुळे, गुजरातचे "अकार्यक्षम मॉडेल"च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामुदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर वायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले आहे. गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. "मुख्यमंत्र्यांवर विश्‍वजीत राणेंची आगपाखड़" हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या “कोरोना-मृतांसाठी राखीव” ठेवाव्या लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com