माझ्यामुळे मराठा समाज शांत आहे; त्याचा अंत पाहू नका : संभाजीराजे - Maratha Community keep quiet due to me says Sambhajiraje | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यामुळे मराठा समाज शांत आहे; त्याचा अंत पाहू नका : संभाजीराजे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 मे 2021

संभाजीराजेंनी सुचविले विविध पर्याय.... 

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्याने समाज अशांत आहे. तो कधीही रस्त्यावर येऊ शकतो. मात्र हा समाज माझ्यामुळे शांत आहे. त्याचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला केले. (Chatrapati Sambhajiraje clears his stand about Maratha Reservation) राज्य सराकरने पाच जूनपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा कोरोना असो की कोणती परिस्थिती आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी भेट घेत सर्वसहमती घडविण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय करता येईल, यासाठीचे काही मुद्दे त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले. राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

ते म्हणाले की सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलतोय. मी कोणताही पक्ष, राजकीय अजेंडा घेऊन आलो नाही. आमचा एकच विषय आहे समाजाला न्याय मिळवून द्यावा. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज आहे. या मुद्यासाठी मी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढतोय. छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण लागू केले होते. त्यासाठी त्यांनी खामगाव येथे परिषदेत केलेल्या भाषणात मी छत्रपती म्हणून नाही तर शेतकरी आणि शिपाई म्हणून आलो आहे, असे त्यांनी सांगितल होते. तसेच मी देखील छत्रपती म्हणून नाही तर शेतकरी व शिपाई म्हणून आज येथे आलो आहे. आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यावर आता सगळे पक्ष एकमेकांवर आरोप करतायत. त्यांच्या भांडणात आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला न्याय द्या, हीच आमची भूमिका आहे. लोकांना वेठीस धरू नका. 

मराठा आरक्षणासाठी मी महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची मतं जाणून घेतो आहे. आम्हाला आक्रमक होता येत. पण ही वेळ आहे का? किती वर्षे लोकांना असच ठेवायचं?  समाजात असंतोष आहे. तो माझ्यामुळे शांत आहे. त्यांचा अंत पाहू नका, असे आवाहन त्यांनी केले.

ही बातमी वाचा : संभाजीराजेंच्या मनात काय भलतचं चाललयं?

ही बातमी वाचा : चंद्रकांतदादा, छत्रपती संभाजीराजेंवर दबाव टाकू नका

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख