"संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं.." निलेश राणेंचा टोला

राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.
Sarkarnama Banner - 2021-05-28T113938.376.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-28T113938.376.jpg

मुंबई : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण maratha reservation रद्द केलं आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे sambhaji chhatrapati राज्यातील नेत्यांची भेट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. nilesh rane taunt sambhaji chhatrapati maratha reservation

"संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही." असे टि्वट करीत निलेश राणेंनी संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे. 

संभाजीराजे यांनी काल सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. संभाजीराजेंनी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. 

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, राज ठाकरे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. राज ठाकरे यांचे आजोबा आणि माझें आजोबा यांचे असणारे सबंध शिवाय गडकिल्ल्यांचं संवर्धन यावरही आम्ही चर्चा केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे पण त्यातून आता मार्ग कसा काढायचा आणि समाजाला न्याय कसा मिळायला हवा यावर चर्चा झाली. 

मुंबई येथे सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी सकाळी साडेनऊ वाजता  संभाजीराजेंनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत सुमारे बारा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे शरद पवारांना सांगितल्याचे संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज संभाजीराजे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 
Edited by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com