काँग्रेसमधील कलह वाढला; मंत्री, आमदार, नेत्यांच्या दिल्लीत गाठीभेटी

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
Many Punjab Congress MLAs are unhappy with the Chief Ministers administration
Many Punjab Congress MLAs are unhappy with the Chief Ministers administration

नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचा कहर कमी होत असताना पंजाब काँगेसमधील कलह वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh) यांच्याविरोधात काही मंत्र्यांनीच मोर्चा उघडला आहे. तसेच काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot singh  Sidhu) व मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने धुसपूस सुरू आहे. याची दखल काँग्रेस नेतृत्वाला घ्यावी लागली असून आज नाराजांना दिल्लीत बोलवण्यात आले आहे. (Many Punjab Congress MLAs are unhappy with the Chief Ministers administration) 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते.

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्यूत्तर देत हे सिद्ध करण्याचे खूले आवाहन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर इतर नेते व मंत्रीही नाराज आहेत. 

सिद्धू यांच्यासह नाराज मंत्री, आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना आज दिल्लीत बोलावण्यात आले आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून हरीश रावत यांच्यासह तीन जणांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे मंगळवारी हे पॅनेल सिध्दू, काँग्रेस नेते परगट सिंह आणि इतर नेत्यांना भेटणार आहे. तसेच मुख्यमंत्रीही या पॅनेलसमोर आपलं म्हणणं मांडतील. निवडणूकीआधी काँग्रेसमधील कलह कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

दरम्यान, पॅनेलसमोर आपले म्हणणे मांडल्यानंतर सिद्धू म्हणाले, मी इथे पंजाबच्या लोकांचा आवाज पोहचवायला आलो आहे. पंजाबमधील सत्य परिस्थिती मी सांगितली आहे. पंजाबच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. सत्याचा कधीच पराभव होत नाही. आम्हाला पंजाबला जिंकायचं आहे. पंजाबविरोधातील प्रत्येक शक्तीचा पराभव होईल.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com