बारावी परीक्षा लांबणीवर?, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल 

पोखरियाल यांना २१ एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती.
Education Minister Ramesh Pokhariyal admitted in AIIMS hospital
Education Minister Ramesh Pokhariyal admitted in AIIMS hospital

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) च्या इयत्ता बारावीच्या परीक्षांवर निर्णय होणार होता. (Education Minister Ramesh Pokhariyal admitted in AIIMS hospital )

पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परीक्षेचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज विशेष बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने बैठक रद्द करण्यात आली. देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचे या बैठकीकडे लक्ष लागले होते. 

पोखरियाल यांना २१ एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली होते. संपर्कातील लोकांनी चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच मंत्रालयाचे कामकाज नियमितपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले होते. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आहे. 

बारावी परीक्षांबाबत मागील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यामध्ये पोखरियाल यांच्यासह सर्व राज्यांतील शिक्षण मंत्री सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पोखरियाल यांनी परीक्षा रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. परीक्षेचे स्वरूप आणि इतर माहिती एक जून रोजी जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, सीबीएसई बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सर्वच राज्यांतील शिक्षण मंत्री तसेच शिक्षण मंडळांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाऊ शकतो. केवळ काही महत्वाच्या विषयांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षा केंद्रांच्या संख्येतही जवळपास दुपटीने वाढ केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले विद्यार्थी, परीक्षा केंद्रांवर नियुक्ती देण्यात येणारे शिक्षक व इतर कमचाऱ्यांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे परीक्षा केंद्रांवर सक्तीने पालन केले जाईल, अशी माहिती मिळते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com