महाविकास आघाडीतील संशयकल्लोळाला तात्पुरता विराम

सह्याद्री अतिथीगृहावर आज महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली.
Mahavikas Aghadi coordination committee meeting held in mumbai
Mahavikas Aghadi coordination committee meeting held in mumbai

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच काँग्रेसचा स्वबळाचा नारा अन् शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॅाम्बनंतर संशयकल्लोळ वाढला. त्यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. पण आज झालेल्या आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर या चर्चेला तात्पुरता विराम मिळाला आहे. (Mahavikas Aghadi coordination committee meeting held in mumbai)

सह्याद्री अतिथीगृहावर आज महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, सुनील केदार आदी नेते उपस्थित होते. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. त्यामुळं या बैठकीमध्ये होणाऱ्या चर्चेबाबत उत्सुकता होती.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचं म्हटलं होतं. तसेच भाजपशी युती करण्यावरही या पत्रात जोर देण्यात आला होता. या पत्राआधी काही दिवसांपूर्वीच ठाकरे व मोदींची भेटही झाली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद व प्रशांत किशोर यांनी दहा दिवसांत दोनदा भेट, दिल्लीत बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची अनुपस्थिती या घडामोडींमुळं महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे बोलले जात होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मी मुख्यमंत्री होण्याची भाषा केलेली नाही. महाआघाडीत समन्वय असून कसलाही वाद नाही. स्वबळाचा नारा देणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. प्रत्येकाला पक्ष मोठा करायचा आहे. भाजपकडूनही तमाशाच सुरू होता. आमच्यात काही नाराजी नाही. शरद पवार कुणालाही एकत्र करत नाहीत. शिवसेनाही आजच्या बैठकीला गेली नाही, असे पटोले यांनी सांगितले. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

आघाडीत विसंवाद नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे म्हणाले, आघाडीत विसंवाद नसून कोणतेही गैरसमज नाहीत. भाजपसोबत जाण्याच्या चर्चेतही दम नाही. समन्वय समितीच्या बैठकीत सरनाईकांच्या पत्रावर चर्चा झालेली नाही. महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाली असून आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ देण्याचे ठरवले जाईल. याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही शिंदे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com