भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो पण आता त्यांनीच पाठ फिरवली!

चिराग पावसान यांनी बिहारमध्ये आशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे.
Chirag Paswan attacks on BJP over silence amid LJP fued
Chirag Paswan attacks on BJP over silence amid LJP fued

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात त्यांचे काका खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांच्यासह पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. चिराग यांनी तातडीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून काकांसह पाचही खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवला. आता पासवान यांनी उघडपणे भाजपवर टीका सुरू केली आहे. (Chirag Paswan attacks on BJP over silence amid LJP fued)

चिराग पावसान यांनी बिहारमध्ये आशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. मागील काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडींवर वृत्तसंस्थेशी बोलताना पासवान यांनी भाजपवर शरसंधान साधले. यामध्ये भाजपकडून काहीतरी मदत मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. भाजपची शांतता मनाला खटकत आहे. माझे वडील रामविलास पासवान आणि मी भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो. पण सध्याच्या अडचणीच्या काळात मला गरज असताना ते तिथे न्वहते, अशी खंत पासवान यांनी व्यक्त केली.   

भाजपशी एकतर्फी संबंध राहू शकत नाही, असं म्हणत पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, असा निर्णय घेण्यास भाग पाडले तर पक्ष पुढील पावले टाकण्यास स्वतंत्र आहे. सर्व पर्यायांचा विचार केला जाईल. पक्षाच्या राजकीय भवितव्याचा निर्णय पक्षाच्या बाजूनं कोण उभे राहील, यावर अवलंबून आहे. 

दरम्यान, या घडामोडींवर चिराग यांनी यापूर्वीही भावना व्यक्त केल्या आहेत. चिराग यांनी ट्विटवर म्हटले होते की, मी माझे कुटुंब आणि माझ्या वडिलांना निर्माण केलेला पक्ष एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी अपयशी ठरलो. पक्ष हा मातेप्रमाणे असून, मातेची कधीही फसवणूक करु नये. लोकशाहीत लोक हेच राजे असतात. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. 

चिराग यांनी या ट्विटसोबत एक पत्रही जोडले होते. हे पत्र त्यांनी त्यांच्या काकांना होळीदिवशी लिहिले होते. मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केल्यानंतर पारस हे नाराज होते आणि माझा चुलतभाऊ प्रिंस राज यांना प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दलही ते खूष नव्हते, असे चिराग यांनी या पत्रात म्हटले आहे. प्रिंस राज हे आता पारस यांच्या गटात आहेत. रामविलास पासवान हे जिवंत होते त्यावेळी त्यांच्यावर टीका करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या नेत्यांना पारस यांनी कधीही उत्तर दिले नाही, असेही चिराग यांनी पत्रात म्हटले आहे. प्रिंस राज यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्कारासाठी पारस यांनी 25 लाख रुपये घेतल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com