महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा केंद्रीय मंत्र्यांना साक्षात्कार  - Maharashtra Karnataka border issue is over Bhagwant Khuba | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा केंद्रीय मंत्र्यांना साक्षात्कार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

मंत्री खुबा यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद, विकासकामे यावर आपली मते मांडून भविष्यातील आव्हानांवर चिंता व्यक्त केली

बंगळूर : बिदर भागातील मराठी मतांवर निवडून आलेले खासदार व नूतन केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांना मंत्रिपदावर जाताच महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सीमावाद एक संपलेला अध्याय असल्याचे म्हटले आहे.Maharashtra Karnataka border issue is over Bhagwant Khuba

मंत्री खुबा यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद, विकासकामे यावर आपली मते मांडून भविष्यातील आव्हानांवर चिंता व्यक्त केली. सीमाप्रश्नावर बोलताना बिदरमधील मराठी जनता कानडी लोकांशी सामंजस्याने रहात असल्याचे सांगून ते स्वत:हून कानडी भाषा शिकत असल्याचा त्यांनी दावा केला. ते म्हणाले की, सीमावर्ती जिल्ह्यांबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेला वाद हा एक बंद अध्याय आहे. महाराष्ट्र सरकार दावा करीत असलेल्या प्रदेशात बेळगाव, भालकी, निपाणी, खानापूर आणि कारवारसह बिदर भागाचाही समावेश आहे. या भागांच्या हस्तांतरणासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

सीमावाद अस्तित्त्वात नसल्याचा दावा करून ते म्हणाले की, हा मुद्दा खेचण्यात काही अर्थ नाही. कल्याण-कर्नाटक प्रदेशातील मराठी भाषिक लोकांनी कन्नड स्वीकारल्याचा त्यांनी जावईशोधही लावला. मराठी लोक सीमाप्रश्न विसरून आपल्या मुलांना, कन्नड भाषा शिकवू लागले असल्याचा त्यांनी दावा केला. भगवान खुबा यांना केंद्रात खत व रासायनिक लेखा राज्यमंत्रीपद देण्यात आले असून, लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी, केंद्र सरकारच्या योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लिंगायत समाजाचे कांही नेते मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पदावरून उतरवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या विषयावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठा फेरबदल

चित्रकूट :  येथील दीनदयाळ शोध संस्थानच्या आरोग्यधाम परिसरात शुक्रवारपासून (ता. ९) सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक जबाबदारींमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार संघाच्या राजनैतिक संपर्काची जबाबदारी सहसरकार्यवाह अरुण कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघ व भारतीय जनता पक्ष यातील समन्वयाचे महत्त्वाचे काम या जबाबदारीत येते. याअगोदर ही जबाबदारी दुसरे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांच्याकडे होती.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख