राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठा फेरबदल

राजनैतिक संपर्काची जबाबदारी सहसरकार्यवाह अरुण कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-13T082027.803.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-13T082027.803.jpg

चित्रकूट :  येथील दीनदयाळ शोध संस्थानच्या आरोग्यधाम परिसरात शुक्रवारपासून (ता. ९) सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक जबाबदारींमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.rss arun kumar sees work of coordination with bjp instead of krishna gopal

या बदलानुसार संघाच्या राजनैतिक संपर्काची जबाबदारी सहसरकार्यवाह अरुण कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघ व भारतीय जनता पक्ष यातील समन्वयाचे महत्त्वाचे काम या जबाबदारीत येते. याअगोदर ही जबाबदारी दुसरे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांच्याकडे होती.

यासोबतच आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पश्चिम बंगाल क्षेत्रीय प्रचारकामंध्येही बदल करण्यात आला आहे. ही जबाबदारी प्रदीप जोशी यांच्याकडे होती. त्यांना आता संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीत सहसंपर्क प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले आहे. बंगाल व ओडिशा प्रांत, विभाग प्रचारकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानभेची निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या बंगाल निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. ते पाहता उत्तर प्रदेश सारखे मोठे व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य हातातून जाऊ नये, यादृष्टीने संघ परिवाराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संघातील या संघटनात्मक बदलांकडे बघितले जात आहे.

शाखा सुरू होणार
संघाच्या देशभरातील २७ हजार १६६ शाखा पुन्हा मैदानांमध्ये सुरू होतील. कोरोना परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच १२ हजारांवर इ-शाखासुद्धा सुरू राहतील. या व्यतिरिक्त साप्ताहिक एकत्रीकरणाचे कार्यक्रम १० हजारांवर तर ३६२० इ-एकत्रीकरण होत आहे. लॉकडाउनच्या काळात विशेषत्वाने ९६३७ कौटुंबिक एकत्रीकरण सुरू करण्यात आले आहे.

स्वयंसेवकांना कोरोना प्रशिक्षण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन स्वयंसेवकांना या संसर्गापासून लोकांना वाचविण्याचे आणि समाजाचे मनोबल वाढविण्याचे विशेष प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल. हे प्रशिक्षित स्वयंसेवक त्या-त्या ठिकाणी सरकारी यंत्रणांना मदत करतील. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, भैयाजी जोशी, राम माधव, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल याच्यासह देशभरातील प्रांत प्रचारक उपस्थित होते.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com