राणेंचा पाय खोलात; आमदार नितेश राणेंसह आईविरोधात लुकआउट नोटीस

डीएचएफएल कर्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.
A look out Notice has been issued against Nitesh Rane and his mother
A look out Notice has been issued against Nitesh Rane and his mother

पुणे : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्याच रात्री ते जामीनावरही सुटले. या अटकेनं राज्याच्या राजकारणांत मोठं वादळ उठलं. राणेंसाठी हा मोठा धक्का होता. त्यातून सावरत असतानाच आता त्यांच्या कुटूंबाविरोधातच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. (A look out Notice has been issued against Nitesh Rane and his mother)

एका कर्ज प्रकरणात नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. डीएचएफएल कर्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. त्यांनी 65 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याची तक्रार पोलिसांकडं आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं ही तक्रार दिली आहे. 

पंचवीस कोटींचे कर्ज घेतलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीच्या नीलम राणे या सह अर्जदार होत्या. आर्टलाईनकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच नीलम हॉटोल्स प्रा. लि. या कंपनीने 40 तोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचीही 34 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुणे पोलिसांनी तीन सप्टेंबर रोजी लुकआऊट नोटीस बजावल्याचे समजते. न्यायालायच्या आदेशानुसार ही नोटीस काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली. यावरून भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ही कारवाई सूडबुध्दीने करण्यात आल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री व शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. 

त्यातच आता राणे कुटूंबातील दोघांना लुकआऊट नोटीस बजावण्यात आल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून ठाकरे सरकारव टीका केली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुध्दीने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com