प्रसाद वाटपावरही बंदी! विघ्नहर्त्याच्या उत्सवावर भाजप सरकारकडून कडक निर्बंध

या काळात अन्न किंवा प्रसाद वाटप करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
Karnataka govt declares SOPs for Ganesh Chaturthi celebrations
Karnataka govt declares SOPs for Ganesh Chaturthi celebrations

बंगलुरू : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर भाजपने गणेशोत्सव काळात निर्बंध लादू नयेत, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकात गणेशोत्सवावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. (Karnataka govt declares SOPs for Ganesh Chaturthi celebrations)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी गणेशोत्सवादरम्यान कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील केले जातील, असे संकेत दिले होते. पण रविवारी कर्नाटक सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार, मिरवणुकीदरम्यान किंवा उत्सवादरम्यान केवळ 20 लोकांना एकत्रित येण्याची मान्यता देण्यात आली आहे. तसेच रात्री नऊ वाजल्यानंतर मिरवणूक किंवा गणेशोत्सवातील इतर कार्यक्रम करता येणार नाहीत. 

उत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. केवळ इको फ्रेंडली गणपती मुर्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. या काळात अन्न किंवा प्रसाद वाटप करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच दोन टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण वाढीचा दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. उत्सवादरम्यानन रात्रीच्यावेळी संचारबंदी कायम असेल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले आहे. त्यासाठी काही निर्बंधही लावण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास हे निर्बंध कडक करण्याचा इशाराही राज्य सराकरनं दिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यातील रुग्णसंख्या तुलनेत बरीच कमी आहे. तर सप्टेंबर किंवा पुढील महिन्यात तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंध लावण्यात आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारनंही सर्व राज्यांना उत्सव काळात दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून महाराष्ट्र सरकारच्या निर्बंधांवर टीका केली जात आहे दहीहंडी साजरी करण्यास घातलेल्या बंदीनंतर भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला हा उत्सव साजरा करण्याचा इशारा दिला होता. गणेशोत्सवावरही निर्बंध नको, अशी जोरदार मागणी भाजपने केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com